शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांचा अजूनही बैलबंडीने प्रवास

By admin | Updated: December 4, 2014 23:06 IST

शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचा दिंडोरा राज्य शासनाकडून पिटविला जातो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक आरोग्य सेवेपासून कोसोदूर आहेत.

शोकांतिका : ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे धिंडवडेप्रविण खिरटकर - वरोराशहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचा दिंडोरा राज्य शासनाकडून पिटविला जातो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक आरोग्य सेवेपासून कोसोदूर आहेत. गंभीर बाब अशी की शहरी भागात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा स्पर्श अद्यापही ग्रामीण भागातील काही गावांना झाला नाही. अतिशय गंभीर अवस्थेत रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाचे असल्यास बैलबंडीने आणावे लागत आहे.वरोरा तालुक्यात माढेळी, नागरी, कोसरसार, सावरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरोरा शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात जवळपास सहा शासकीय रुग्णवाहिका आहे. यासोबतच अनेक खासगी रुग्णवाहिका आहे. १०८ क्रमांकावर कॉल करा रुग्णवाहिका उपलब्ध असल्याच्या मोठमोठ्या जाहिराती आजही सुरु आहेत. परंतु ही जाहिरात ग्रामीण भागात पोहचविण्याचे सौजन्य आरोग्य विभागाने दाखविले नसल्याने ग्रामीण भागातील जनता याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. वरोरा तालुक्यातील खैरगाव येथील नामदेव वरारे या व्यक्तीस ताप आला. गावात शासकीय व खासगी रुग्णसेवेची वाणवा असल्याने त्वरित उपचार मिळाले पाहिजे म्हणून त्यांच्या कुटुंबियानी बैलबंडी जुंपली. बैलबंडीत गादी टाकून थेट वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय गाठून प्रकृती दाखविली. ताप अधिक असल्याने नामदेवला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल करुन घेतले. वरोरा ते खैरगाव अंतर नऊ किलोमीटरचे आहे. या नऊ किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका गेली असती.एखादे खासगी वाहनही किरायाने घेऊन रुग्णालय गाठता आले असते. परंतु ग्रामीण भागात सोयाबीन व कापसाला दर नाही. त्यामुळे आर्थिक चणचण असल्याने रुग्णांनाही बैलबंडीतून प्रवास करीत रुग्णालय गाठावे लागत आहे. यासोबतच रुग्णवाहिका मिळण्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.