शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

चिंचाळा जि. प. शाळा बनली आंतरराष्ट्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:02 IST

राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या नावाने आंतरराष्ट्रीय १३ शाळांचे एकाच वेळी उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चिंचाळा येथील जि. प. शाळेचा समावेश आहे.

ठळक मुद्देगुणवत्ता सुधारणार : राज्यातील केवळ १३ शाळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या नावाने आंतरराष्ट्रीय १३ शाळांचे एकाच वेळी उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चिंचाळा येथील जि. प. शाळेचा समावेश आहे.भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चिंचाळाच्या नामफलकाचे अनावरण जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे, सभापती समाजकल्याण ब्रिजभूषण पाझारे, सभापती कृषी व पशुसंवर्धन अर्चना जीवतोडे, सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत ढोडरे, प्रविण बोडेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांची उपस्थिती होती.आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षणमातृभाषेतून शिक्षण व इंग्रजीवर प्रभुत्व या पध्दतीने शाळेचे शिक्षण होणार आहे. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. सध्या चिंचाळा येथील शाळेमध्ये नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण डोर्लीकर, संगीता बेले यांनी केले तर मुख्याध्यापक नामदेव आस्वले यांनी उपस्थितांचे आभार मानले.