शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, नागपूर, अकोला, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:55 IST

पॉवरसिटी फोटोग्राफर क्लबच्या वतीने स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी तब्बल पाचशेवर छायाचित्र प्रदर्शनात स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. यात चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांनी पुरस्कार पटकाविला.

ठळक मुद्देचंद्रपुरात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन : ५०० स्पर्धकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पॉवरसिटी फोटोग्राफर क्लबच्या वतीने स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी तब्बल पाचशेवर छायाचित्र प्रदर्शनात स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. यात चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांनी पुरस्कार पटकाविला.तीन दिवसीय प्रदर्शनीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी केंद्रीय अर्थमंत्री शांताराम पोटदूखे, जिल्हाधिकारी डॉ. खेमनार, पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे भागवत, त्रिवेदी, विजय बदलख, बंडू लडके, मनोज टहलियानी, सुनील राव, जि. प. सभापती ब्रिजभुषण पाझारे, आदींनी प्रदर्शनाला भेट दिली. वेडिंग, वाईल्ड लाइफ आणि हौशी छायाचित्र अशा तीन गटात हे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी जगप्रसिध्द छायाचित्रकार बैजू पाटील यांनी छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी नागपूरचे शेखर सोनी, चित्रकार सुदर्शन बारापात्रे, माजी नगरसेवक संजय वैद्य, राजू जोशी , आयोजक गोलु बाराहाते, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते.नेचर व वाइल्ड गटात अनिकेत लुनावत चंद्रपूर, राहूल कुचनकर, कोलपूरचे ज्ञानेश्वर वैद्य यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.हौशी गटात ठाण्याचे प्रकाश पराडकर, चंद्रपूरचे नारायण कुंभारे, नागपूरचे अमित दत्ता यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार पटकाविला. वेडिंग गटात अकोला येथील विजय मोहरील, चिचपल्ली येथील सुमित साखरे, नागपूरचे कुणाल चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.संचालन प्रा. श्याम हेडाउ प्रास्ताविक व्यंकटेश नरखेडकर यांनी मानले. यावेळी अमोल मेश्राम, विशाल वाटेकर, टिंकू खाडे, शशांक मोहरकर, राहूल चिलगीलवार, रोहित बेलसरे, प्रशिक पडवेकर, नीतिन टहलानिया, अतुल कोतरीवार, परिक्षित केदारपवार, मयुरी टेकाम आदी उपस्थित होते.