शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फे रो अलॉय प्लान्टमधील ३८५ कंत्राटी कामगारांना वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:23 IST

फेरो अलॉय प्लान्टमध्ये मागील २५ वर्षाहून अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या .....

ठळक मुद्देकामगारामध्ये आनंद : हंसराज अहीर यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फेरो अलॉय प्लान्टमध्ये मागील २५ वर्षाहून अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या अस्थायी कंत्राटी कामगारांच्या वेतन वृध्दीबाबतचा प्रलंबित प्रश्न केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने अखेर मार्गी लागला असून येत्या १ आॅगस्टपासून या कंत्राटी कामगारांना मिळणाºया मासिक वेतनात वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच अन्य सुविधासुध्दा या कामगारांना प्राप्त होणार आहे. सदर आकुशल कामगारांना अर्धकुशल कामगारांचा दर्जा देण्याबाबतही निर्णय २७ जुलै रोजी प्रादेशिक कामगार आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या वेतन समझोत्या संदर्भातील बैठकीमध्ये झाल्याने या कामगारांनी ना. हंसराज अहीर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहेत.फेरो अलॉय प्लान्टमधील ३८५ कंत्राटी कामगारांना वेतनवृध्दी मिळण्याकरिता चंद्रपूर फेरो अलॉय प्लॅन्ट मजदूर युनियनद्वारा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्या अनुषंगाने ना. अहीर यांनी प्रादेशिक श्रम आयुक्त नागपूर यांना कामगार युनियनचे प्रतिनिधी तसेच फेरो अलॉय प्लॅन्टचे प्रबंधनासह बैठकीचे आयोजन करून वेतन वृध्दीचा तिढा सोडविण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानूसार २७ जुलैलक वेतन समझोत्याकरिता प्रादेशिक श्रम आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीत स्वत: आर.एल.सी. तरूण कुमार सिंग, चंद्रपूर फेरो अलॉय प्लॅन्टचे उपमहाप्रबंधक राकेश कुमार शर्मा, पी. पी. चक्रवर्ती तसेच सी. एफ. ए. प्लॅन्ट मजदूर युनियनचे महासचिव किसन साहू, उपाध्यक्ष अर्जुन तिवारी व कार्याध्यक्ष शंकर बुटले, यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत कंत्राटी कामगारांच्या वेतनवृध्दीबाबत लेखी करार करण्यात आला. तसेच या बैठकीत या कामगारांच्या वेतनवृध्दी बरोबरच अन्य सुविधाबाबत ही निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कामगारांना कॅन्टीन सुविधा, सायकल भत्ता, रात्रपाळी भत्ता, याबाबत स्थानिक पातळी वरून येत्या २ महिन्यांत निर्णय घेतला जाईल असेही या समझोत्याद्वारे फेरो अलॉय प्लॉट व्यवस्थापनाने स्पष्ट केले.ना. अहीर यांच्या सुचनेनुसार केंद्र सरकारच्या न्युनतम वेतन कायद्यानुसार या अस्थायी कंत्राटी कामगारांना अर्धकुशल कामगाराचा दर्जा देण्याचा निर्णयसुध्दा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अनेक अधिकारी उपस्थित होते. त्याच्या उपस्थितच सदर निर्णय घेण्यात आला.वेतनवृध्दी तसेच विविधांगी सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यशस्वी मध्यस्थी करून प्रदीर्घ कालावधीपासून कार्यरत फे रो अलॉय प्लान्टच्या या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून दिला. त्याबद्दल कामगारांनी गृहराज्यमंत्री अहीर यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी मजदूर युनियनचे पदाधिकारी किसन साहू, अर्जुन तिवारी, शंकर बुटले, राजू सातपूते, प्रमोद अतकरे, दामोधर मेघे, सुखदेव अंबादे, राजू ढवळे, पंतलाल यादव, दिवाकर दोडेवार, योगदाज पारधी, मनोज सिंह, रमणी हलदर, श्रीकांत मुडे, देवमन वानखेडे, सुनिल दांडेकर उपस्थित होते.