शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

११ नगरसेवकांविरुध्दची याचिका फेटाळली

By admin | Updated: August 6, 2015 02:02 IST

स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामू तिवारी यांच्यासह ११ नगरसेवकांविरुध्द अपात्रतेची कारवाई ...

महापौरांवरील संकटही टळले : तिवारी, लहामगेसह ११ नगरसेवकांना दिलासाचंद्रपूर : स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामू तिवारी यांच्यासह ११ नगरसेवकांविरुध्द अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची याचिका आयुक्त अनुपकुमार यांनी फेटाळली. ही याचिका नगरसेवक प्रशांत दानव आणि नगरसेविका सुनिता लोढिया यांनी दाखल केली होती. विशेष म्हणजे, या ११ नगरसेवकांमध्ये महापौर राखी कंचर्लावार यांचेसुध्दा नाव होते. मात्र आयुक्तांच्या निर्णयामुळे महापौर राखी कंचर्लावार यांच्या सदस्यत्वावर घोंगावणारे संकटही टळले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी स्वतंत्रपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीचे गटनेता म्हणून संतोष लहामगे यांची निवड करण्यात आली होती. मात्र मागील महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी महापौर पदासाठी काँग्रेसचा उमेदवार उभा केला होता. लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांसाठी एक व्हीप जारी करून स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीतील काँग्रेस नगरसेवकांनी या सूचनाचे पालन केले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून महापौर पदासाठी उभ्या असलेल्या सुनिता लोढिया व प्रशांत दानव यांनी याविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करीत माजी सभापती रामू तिवारी, सभापती संतोष लहामगे, राजेश अड्डूर, सुभेदिया कश्यप, मेहर सिडाम, राखी कंचर्लावार, करीमुद्दीन काजी, संगिता अमृतकर, एकता गुरले, अनिल रामटेके आणि दुर्गेश कोडाम यांचे महापालिकेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना आयुक्त अनुप कुमार यांनी दोन्ही याचिका फेटाळल्या. या सुनावणीदरम्यान त्यांनी सांगितले की नियमानुसार आघाडी स्थापन केल्यानंतर मूळ राजकीय पार्टी आघाडीमधील सदस्यांमधून आपला नेता निवडू शकत नाही. शिवाय मूळ राजकीय पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे उल्लंघनही त्या सदस्यांची योग्यता प्रभावित करीत नाही.याबाबत मनपाचे माजी सभापती रामू तिवारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले. विकासात बाधा बनण्यापेक्षा शहराच्या विकासात सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. यासंदर्भात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)