शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशके निघाली भ्रष्ट, धानपिक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:06 IST

तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देधानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकदा विविध औषधांची फवारणी करूनही धानपिक हातातून गेल्याने कीटकनाशके निघाली भ्रष्ट आणि धानपिक झाले नष्ट, अशी शेतकºयांची ओरड सुरू आहे.याबाबत परिसरातील अनेक शेतकºयांनी तहसीलदार टेंबेकर यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी लेखी निवेदन दिले आहे. त्यानुसार तालुका परिसरातील शेतकºयांच्या बांधावर कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण करणे सुरू असून शुक्रवारी देवाडा खुर्द येथे कृषी सहाय्यक राठोड यांच्यासमवेत अनेक शेतकºयांनी परिसरातील नष्ट झालेले धानपीक दाखविले आणि तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील परिसरामध्ये यावर्षी तुरळक पाऊस पडला. तरीही धानपिक चांगल्या स्थितीत होते. मात्र धानपीक गर्भाशयात असताना विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी विविध प्रकारची महागडी औषधे विकत घेऊन फवारणी केली. मात्र अनेक प्रयत्नानंतरही रोग नियंत्रणात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.हाती आलेले धानपिक जावू नये यासाठी प्रत्येकांनी जीवाची पर्वा न करता पाठीवर सारखा पंप घेऊन फवारणी केली. त्यांच्या या परिश्रमाला काही प्रमाणात यश सुद्धा आले. त्यामुळे बेरड, करपा, लाल्या आदी रोग नियंत्रणात आणता आले. काही प्रमाणात तग धरून असलेले धानपिक हाती येण्याची शक्यता होती. परंतु तग धरून असलेल्या धानपिकाला मावा तुडतुडा या भयंकर रोगाने ग्रासल्याने नानाविध प्रकारची औषधी फवारणी करून सुद्दा या रोगाला नियंत्रणात आणने कठीण झाल्याने अखेर परिसरातील शेतकºयांचे धानपिकाचे तणसात रूपांतर झाले आहे.या पिकाची कापणी करून जनावरांना चारा टाकणे सुद्धा कठीण झाले आहे. देवाडा खुर्द येथील शेतकरी गणपती स्पतरे यांनी तर फवारणी करताना घरी आले आणि चिंतेने बेहोश पडले. त्यांना येथील शेतकºयांनी चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. पाच-सात दिवसानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्याची सुट्टी करून आणल्यानंतर आजही त्याच्या डोळ्यासमोर धानपिकाचे वाईट चित्र दिसत असल्याने ते धानपिक गेले, असे सारखे वेड्यासारखे बळबळत असतात. ते कुणालाही ओळखत नाही, अशी अवस्था झाली आहे.शेतकºयांचा जीव मेटाकुटीलासावली : तालुक्यातील धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकरी औषधांची फवारणी करता करता हवालदिल झाले आहेत. या वर्षीच्या उष्ण व दमट हवामानामुळे आणि अत्यल्प पावसामुळे धान पिकाला अपेक्षीत असे पोषक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे धानावर येणाºया बहुतेक सर्वच प्रकारच्या रोगाने तोंडवर काढले असून दर आठ-दहा दिवसात वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. धान परिपक्व होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच विविध रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले पीक नष्ट होण्याची भीती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे. पाने गुंडाळणारी अळी, खोड कीडा, मावा, तुडतुडा, मानमोडी यासारखे असंख्य रोग धानावर येत असल्याने कृषी विभागही हतबल झाला आहे. तर औषधांची फवारणी करता करता शेतकरीही तंगून गेले आहेत. आसोलामेंढा तलाव आणि गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर शेतकºयांनी मोठ्या आशेने रोवणी आटोपली. प्रसंगी खासगी कर्ज व उसनवार घेऊन रोवण्याचे काम केले. मात्र धानाला विविध रोगाने पछाडल्याने शेतकºयांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने पिकाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना न्याय देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.