शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रातून कीटकनाशके जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:47 IST

अधिकृत विक्रेता नसतानाही डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन कीटनाशक विक्री करणाऱ्या येथील सुरज अ‍ॅग्रो एंजसीमधून सदर कीटनाशकाचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली.

ठळक मुद्देजिल्हा गुणनियत्रकांची कारवाई : कंपनीनेच केली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अधिकृत विक्रेता नसतानाही डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन कीटनाशक विक्री करणाऱ्या येथील सुरज अ‍ॅग्रो एंजसीमधून सदर कीटनाशकाचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली.वरोरा शहरातील सुरज अ‍ॅग्रो एजंसीकडे डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन (कीटनाशक) कंपनीची अधिकृत डिलरशिप नसताना विक्री सुरू असल्याची तक्रार कंपनीकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सदर कंपनीचे दिल्ली येथील व्यवस्थापक भीमसेन व कंपनीचे वरिष्ठ तपास अधिकारी श्यामसिंग यांनी लगेच वरोरा शहर गाठले. दरम्यान हे कीटनाशक बनावट असल्याची शक्यताही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली. तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक एम. जी. सोनटक्के यांनी शुक्रवारी कीटनाशकाची तपासणी केली. यावेळी कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. हे कीटनाशक बनावट आहे की नाही हे प्रयोगशाळेत पाठविल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे एका बाटलीतील नमुने अमरावती येथील कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतून निष्कर्ष येईपर्यंत विक्रीसाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत सुरज अ‍ॅग्रो एंजसीच्या संचालकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता काहीच न झाले नाही, अशी प्रतिक्रिया दिली.कंपनीचे अधिकृत विक्रेते नसतांना वितरकाकडून त्यांनी खरेदी न केल्याने े कीटकनाशक बनावट करणाऱ्यांकडून आणले असावे, अशी शंका आम्हाला होती. विक्री करीत असल्याची माहिती कंपनीला मिळाली. त्यानुसार आम्ही प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यावरून जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक एम. जी . सोनटक्के यांनी ही कारवाई केली.- भीमसेन, व्यवस्थापककंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट कीटकनाशक विकत असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून सदर कृषी केंद्राची तपासणी केली. उपलब्ध असलेले डुपॉन्ट कीटकनाशक आम्ही कंपनी अधिकाऱ्यांना दाखविले असता हे उत्पादन आमचेच असल्याची कबुली दिली. मात्र ते बनावट की खरे हे शोधण्याचे काम प्रयोगशाळेचे असल्याने आम्ही सदर नमुने अमरावती येथील कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेत पाठविले. उर्वरित साठा सील करून विक्रीला प्रतिबंध घातला.- एम. जी. सोनटक्के, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक