शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायदा ठरत आहे ग्रामपंचायतींना वरदान

By admin | Updated: March 17, 2017 00:50 IST

राज्य शासनाने मागासवर्गीय भागाचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने १९९६ मध्ये पेसा कायदा लागू केला.

मूलभूत गरजांना वाव : आदिवासी भागाचा होत आहे विकास सतीश जमदाडे   आवाळपूर राज्य शासनाने मागासवर्गीय भागाचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने १९९६ मध्ये पेसा कायदा लागू केला. या कायद्याची अमालबंजावणी विकासात्मक दृष्टिकोनाने सुरू झाली असून आज जिल्हात चांगल्या पद्धतीने हा कायदा अंमलात आला आहे. या कायद्याने ग्रामपंचायतींना एक आर्थिक वरदानच मिळाल्याचे त्यांच्या उत्पन्नावरून दिसून येत आहे. आदिवासीबहुल गावात या पेसा कायद्याची अंमलबजावणी होत आहे. पेसा कायदा लागू होण्यासाठी त्या भागातील मागासवर्गीय आदिवासी बांधवांची लोकसंख्या ६० ते ७० टक्के असणे आवश्यक आहे. शासनाने या कायद्यावर विशेष भर देऊन आदिवासी भागातील लोकांचा विकास कसा कराता येईल, या दृष्टीने ‘त्या’ ग्रामपंचायत लोकसंख्येनुसार अनुदान देत आहे. यामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक आधार मिळत असून याच अनुदानाच्या माध्यमातून गावातील विकास साधल्या जात आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा निवारण होण्यास मदत होत आहेत. त्यात रस्ते बांधकाम, महिला सक्षमीकरण, आदिवसी मुलांना शिक्षण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संतुलन अशा विविध विकासात्मक बाबीचा कायद्यात समावेश आहे. तर नव्यानेच स्वच्छ भारत मिशन सुद्धा त्यात घेण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजांचे निवारण होत आहे. आदिवासी बहुल भाग म्हुणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यात १६९ गावे, ३० ग्रामपंचायती पेसा कायद्याअंतर्गत येतात. पेसा अनुदान मिळत असल्यांस येथील गावे विकासाच्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मागासवर्गीय नागरिकांचा संर्पक आधुनिकतेशी जुडला असून त्यांनी विकासाची वाट धरली आहेत. कोरपना तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींना पेसा कायद्याअंतर्गत अनुदान मिळत आहे. त्यामुळे कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी करुन गावाचा विकास साधण्यास आम्ही प्रयत्नरत आहोत. - धनंजय साळवे, सहा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना