उत्पादन वाढणार : कारागिरांना घरीच काम करण्याची संधीपरिमल डोहणे चंद्रपूरपूर्वी सूत कताई व वीणाई करण्याचे काम खादी कार्यालयाच्या इमारतीत चालायचे. त्यामुळे कारागिरांना कार्यालयाच्या इमारतीत जाऊन कताई व वीणाईचे काम करावे लागत असे. परंतु आता कारागिरांना कताई व वीणाईचे काम त्यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या वैयक्तिक वर्क शेडमध्ये करता येणार आहे.कारागिरांना सूत कताई व वीणाईचे काम घरीच करता यावे, जेणे करुन कारागिरांचा कार्यालयात जाण्याचा वेळ वाचेल. त्यामुळे कताई व वीणाईचे काम वाढून खादीचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. हा उद्देश ठेवून कारागिरांना वैयक्तिक वर्क शेडचे बांधकाम करण्यासाठी सुक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयांतर्गत खादी ग्रामोद्योगतर्फे कारागिरांना वर्कशेडचे बांधकाम करण्यासाठी पात्र कारागिरांना ४५ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी १५ हजार रुपयांच्या तीन टप्प्यात मिळणार आहे. त्यासाठी कारागिरांना आपल्या घरी १० बाय १५ आकाराच्या वर्कशेडचे बांधकाम करावे लागणार आहे.वैयक्तिक वर्कशेड दारिद्र्यरेषेखालील कारागिरांनाच देण्यात येत होते. परंतु आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून काम करणारे कारागीर दरवर्षी १०० दिवसांपेक्षा जास्त वीणाई व कताईचे काम करीत असतील तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. २०१४-२०१५ च्या लाभार्थ्यांना वर्कशेड बांधण्यासाठी ४५ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे, तर २०१५-२०१६ च्या येणाऱ्या यादीत निधीची वाढ करण्यात आली असून यापुढे हा निधी ६० हजार रुपयांचा करण्यात आला आहे.३३ लोकांना वर्कशेड मंजूरचंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, मूल, वरोरा, सावली, ब्रह्मपुरी येथे खादी ग्रामोद्योगाचे भंडार आहे. त्यापैकी ब्रह्मपुरी येथील भंडार बंद करण्यात आले आहे. या भंडारापैकी मूल व सावली येथे सूत कताई व वीणाईचे काम चालते. या दोन्ही कार्यालयात मिळून १५० कारागीर आहेत. त्यापैकी सन २०१४ ते २०१५ च्या यादीत ३३ लोकांना वर्कशेड मंजूर झाले आहे. त्यामध्ये मूल येथील एक कारागीर तर सावली येथील ३२ कारागिरांना वर्कशेड मंजूर झाले आहे. त्यापैकी एक लाभार्थी मृत झाला आहे. सन २०१५ ते २०१६ या वर्षीच्या यादीत आणखी १० कारागिरांची नावे पाठविण्यात आली आहेत.महात्मा गांधींच्या कालखंडापासून खादीचा वापर करण्यात येत आहे तसेच घरीच वीणाई व कताईचे काम करता येणार असल्यामुळे कताई व वीणाईचे प्रमाण वाढेल व उत्पादन वाढण्यास मदत होणार.बंडू भडके सचिव,नाग विदर्भ चरखा संघवर्कशेड मंजूर झालेल्या कारागिरांना १५ पहिल्या टप्प्यातील हजार रुपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले आहे. कारागिरांनी बांधकाम सुरु करण्यात आले असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील धनादेशाचे वाटपसुद्धा लवकर करण्यात येणार आहे.बाळू पवार, व्यवस्थापक खादी ग्रामोद्योग आयोग, सावली.
सूत कताई व वीणाई कामगारांना मिळणार वैयक्तिक वर्क शेड
By admin | Updated: April 6, 2016 00:48 IST