शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार मजुरांना मिरची सातऱ्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:19 IST

गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

ठळक मुद्देनागभीड तालुका : शेकडो मजूर कामावर

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र नागभीड तालुक्यातील शेकडो मजुरांना मिरची सातऱ्यांचा रोजगारासाठी आधार मिळाला आहे.नागभीड तालुक्यात मिरची कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणावर मिरची सातरे थाटण्यात आले असून या सातºयावर शेकडो मजूर काम करीत आहेत. तालुक्यात किमान १० ते १५ गावात मिरची सातरे असून एका सातºयावर १५० ते २०० मजूर असे जवळपास तीन हजार मजुरांना काम मिळाला आहे. नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून असते. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अवकृपेने तालुक्याची अर्थव्यवस्था पार डबघाईस आली आहे. परिणामी येथील मजूर वर्गास कामाच्या शोधात दुसºया जिल्ह्यात स्थलांतर करावे लागत आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून आंध्र प्रदेशातील मिरची कंत्राटदारांनी नागभीड तालुक्यात मिरची साफ करण्यासाठी सातरे सुरू केले. अगोदर त्यांनी हा प्रयोग मोहाळी-बाम्हणी येथे केला. या सातºयांना मिळालेला मजुरांचा प्रतिसाद लक्षात घेता, ज्या ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत आहेत, त्या त्या ठिकाणी मिरची सातरे सुरू करण्यात आले आहेत .सद्यास्थितीत कानपा, मोहाळी, बाम्हणी, नवखळा, नवेगाव, मौशी, ओवाळा, वाढोणा, पळसगाव, चिचाळा या ठिकाणी मिरची सातरे सुरु आहेत. यातील काही ठिकाणी मजुरांची उपलब्धता लक्षात घेवून दोन दोन सातरे सुरू करण्यात आले आहेत. ही मिरची जवळच असलेल्या भिवापूर येथील असावी, असा लोकांचा समज आहे. मात्र हा समज चुकीचा असून ही मिरची आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिरचीच्या कांड्या काढून ती साफ झाल्यानंतर ही मिरची विदेशात निर्यात करण्यात येते, अशी माहिती आहे. मिरची साफ करण्यासाठी मजुरांना प्रती बोरीमागे विशिष्ट रक्कम दिली जाते. शारिरिकदृष्या हे काम घातक असले तरी हे काम केल्याशिवाय मजुरांसमोर अन्य पर्याय नसल्याने शेकडो मजूर येथे काम करीत आहेत.