शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्थापना दिनानिमित्त जनसमस्या निराकरण मेळावे होणार

By admin | Updated: January 3, 2015 23:00 IST

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस

चंद्रपूर : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान करण्यात आली होता. त्या पार्श्वभूमीवर जनता व पोलीस यांच्यात समन्वय प्रस्थापित व्हावा यासाठी २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत सर्व सामान्य जनतेच्या सहकार्याने जनतेच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी विविध प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींची पोलीस ठाण्याला भेट आयोजित करून प्रभारी अधिकारी त्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे. तसेच शाळांमधील मुलींसाठी स्वसंरक्षणाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील उपलब्ध हत्यार, दारूगोळा दाखवून त्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलीस बॅण्ड पथकाचे संचालन करण्यात येणार आहे. तसेच एक विशेष मोहीम राबवून पोलीस तपासावरील तसेच न्यायालयात न्यायदानासाठी प्रलंबित प्रकरणातील फिर्यादी यांना समक्ष भेटून त्यांना त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन केलेल्या कार्यवाही संबंधात माहिती देणारा आहे. शाळा-महाविद्यालयात त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन किंवा सदर ठिकाणी कार्यक्रम आयोजन करून वाहतूक नियम, सुरक्षा, आतंकवाद हल्ले याबाबत चर्चासत्र, मेळाव्यांचे आयोजन करून माहिती देण्यात येणार आहे. विशेष मोहिमेद्वारे प्रकरणातील किंमती मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा आहे, अशा प्रकरणातील फिर्यादींना बोलावून त्यांना सदर मुद्देमाल परत घेण्याविषयी कायदेविषयक अडचणी पूर्ण करून मुद्देमाल घेऊन जाण्याबाबत मदत करण्यात येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षात वाहतुकीबाबत माहिती देणार आहे.पोलीस स्थापना दिनानिमित्त घुग्घुस, ब्रह्मपुरी, कोठारी, चिमूर, चंद्रपूर शहर, गडचांदूर, राजुरा येथील पोलीस ठाण्यात कार्यक्रम राबविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)