शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 01:58 IST

ग्रामपंचायत निवडणूक काळात पिंपळगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. वैद्यकीय चमू गावात दाखल होऊन तब्बल ११५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन काहींचे रक्ताचे नमुने ...

ब्रह्मपुरी : ग्रामपंचायत निवडणूक काळात पिंपळगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. वैद्यकीय चमू गावात दाखल होऊन तब्बल ११५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन काहींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांची भेट घेतली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.तालुक्यातील नदीतिरावर वसलेल्या ब्रह्मपुरी शहरापासून सहा किमी अंतरावरील पिंपळगाव येथील तापाचे रुग्ण वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता गेले असता तपासणीअंती डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ६ आॅगस्टला वडसा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी गजभिये यांना याची माहिती दिली. खात्री झाल्याने जिल्हा स्तरावरुन दखल घेत वैद्यकीय चमू पिंपळगावात दाखल झाली. दोन दिवस घरोघरी जाऊन रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आला. काही रुग्ण पॉझीटीव्ह निघाल्याने नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली येथे हलविण्यात आले. तर काही रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र दोन-चार दिवसात गावात पुन्हा तापाची साथ पसरली असून वडसा, गडचिरोली तर काही रुग्ण ब्रह्मपुरी येथील डॉक्टराकडून उपचार घेत असल्याचे समजते. पिंपळगाव येथे भेट दिली असता गावात घाणीचे साम्राज्य असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. घरोघरी साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूची उत्पत्ती होते. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वच्छता ठेवली व पाणी साठवून ठेवू नये, असे वैद्यकीय अधिकारी गजभिये यांनी सांगितले. शिवसेना तालुका प्रमुख अमृत नखाते यांनी गावातील तापाची साथ लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन गावात शिबिर लावण्याची मागणी केली असता पुन्हा एकदा मंगळवारी वैद्यकीय चमू दाखल झाली असून रुग्ण तपासणी शिबिर लागणार असल्याचे समजते. पिंपळगावात आतापर्यंत शेकडो गावकऱ्यांना तापाची लागण झाली असून २५ ते ३० रुग्ण डेंग्यूने प्रभावित झाले आहेत. पैकी पाच रुग्ण बरे होऊन घरी परत आले. दोन रुग्णांना नागपूरला पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्ण ब्रह्मपुरी, वडसा, गडचिरोली व चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. पिंपळगावचा चिमूर विधानसभा क्षेत्रात समावेश होता. पंचायत समिती सदस्या स्वत: पिंपळगाव येथे वास्तव्यास आहेत. जिल्हा परिषद सदस्या पुष्पलता बुराडे नजीकच्या चिखलगाव येथे राहतात. मात्र त्यांनी गावकऱ्यांची अजूनही भेट घेतली नसल्याचे समजते.