शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या जनतेने नेहमीच प्रोत्साहित केले

By admin | Updated: July 3, 2017 00:53 IST

वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पाला सुरुवात झाली. गेल्यावर्षी केवळ प्रयोग केला. पण आतामात्र ५० कोटी हे मिशन झाले असून...

सुधीर मुनगंटीवार : दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात १० लाखांवर वृक्ष लावगडलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पाला सुरुवात झाली. गेल्यावर्षी केवळ प्रयोग केला. पण आतामात्र ५० कोटी हे मिशन झाले असून हे व्रत पूर्ण करताना चंद्रपूरच्या जनतेने विक्रमी वृक्षलागवड करुन दरवर्षी मला काम करायला प्रोत्साहित केले आहे. या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र आत्मियतेने तुम्ही लावलेली वृक्ष देशाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रविवारी येथे केले.शनिवारी ऐरोली येथे वनमहोत्सव २०१७ चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी ज्या प्रदेशाने ना. सुधीर मुनगंटीवार यांना प्रेरणा दिली, त्या त्यांच्या चंद्रपूर जिल्हयात वनमहोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात ते रविवारी सहभागी झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या विक्रमी उपस्थितीत प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. वनमहोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी वनविभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात १० लाख २० हजार ९२ वृक्ष लागवडीची सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंद झाली. या १० लाख वृक्षलागवडीची वाटचाल ही विक्रमाकडे होत असून चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक वृक्षलागवड करणारा जिल्हा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्हयाने माझ्या प्रत्येक मोहिमेला भरभरुन पाठबळ दिले असून आज तर विद्यार्थीसुध्दा मोठया संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी भावनिक होत आभार मानले. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आणि सपना मुनगंटीवार उपस्थित होत्या. सेंट मायकल शाळेतील शेकडो विद्यार्थी व चंद्रपुरातील मान्यवरांच्या उपस्थितीत वनमंत्र्यांनी येथे वृक्षारोपण केले.वसुंधरेला हिरवेकंच करण्याचा संकल्पतासभर चाललेल्या शिस्तबध्द वृक्षारोपणानंतर उपस्थित जनसमुदयाला संबोधित करताना ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयात वनविभाग, वनविकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ शासकीय काम न समजता सुरु केलेल्या वृक्षलागवडीने आपण दिपून गेल्याचे स्पष्ट केले. वसुंधरेला हिरवेकंच्च करण्याचा आपला संकल्प असून हे पुण्याचे काम आहे, असेही म्हणाले. केवळ शासकीय काम न समजता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोकून देत यावेळी नियोजन केले असून त्यांच्यामुळेच जिल्हा विक्रमी वृक्षलागवडीकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण सिनेसृष्टी या जनउपयोगी कार्यात सहभागी झाली आहे. शेकडो लोक रोज हरीत सेनेचे सदस्य बनत असल्याचेही त्यांनी सांगितले.वनमहोत्सव यशस्वी होईल- ना. अहीरयावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुक्ष्म नियोजनातून यंदाचा हा वनमहोत्सव यशस्वी होईल, असे ते यावेळी म्हणाले. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी यावेळी वनविभागाच्या वेबसाईडवर जाऊन वृक्षलागवडीच्या संदर्भातील माहिती घ्यावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या ठिकाणी दर मिनिटाला माहिती अपलोड होत असून चंद्रपूरमध्ये वनविभागाने एकटयाने सायंकाळपर्यंत ७ लाख ७८ हजार ५३९ वृक्षलागवड केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांनी २९ लाखांचे उद्दिष्ट दिले असले तरी हा जिल्हा विक्रमी ४० लाखांच्या वृक्षलागवडीकडे वाटचाल करीत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.