शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला लैंगिक छळ तक्रार समिती गठीत न केल्यास ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

चंद्रपूर : कामाच्या ठिकाणी महिला लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी १० किंवा त्यापेक्षा अधिकारी अधिकारी-कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक कार्यालयांतर्गत तक्रार ...

चंद्रपूर : कामाच्या ठिकाणी महिला लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी १० किंवा त्यापेक्षा अधिकारी अधिकारी-कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक कार्यालयांतर्गत तक्रार समिती गठित केली नाही, तर त्या आस्थापनेवर ५० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. अशा कार्यालयांची तक्रार जिल्हा समितीकडे करता येऊ शकते, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे, पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता कांबळे, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, मनपाच्या सहायक आयुक्त विद्या पाटील, अग्रणी बँक जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, नियमानुसार दर तीन वर्षांनी समितीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सदर समित्यांचे गठन झाले नाही, अशा आस्थापनांचा आढावा घ्या. कार्यालयातील समितीचे सदस्य सेवानिवृत्त किंवा इतर ठिकाणी बदली झाले असतील, तर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अंतर्गत तक्रार समितीच्या वार्षिक अहवालाचे नमुने सर्वांना पाठवून कार्यालयाकडून प्राप्त करावे, अशाही सूचना वरखेडकर यांनी सूचना केल्या.

बॉक्स

अशी असावी समिती

ज्या आस्थापनांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. तिथे या समितीबाबत महिलांमध्ये जनजागृती करावी. ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे. समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून त्यात सदस्यांची नावे व मोबाइल क्रमांक नमूद करावा. या समितीत चार जणांचा समावेश असला पाहिजे.