शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५० फेरीवाल्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:17 IST

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे२८ हजारांचा दंड वसूल : बॅनर जप्तीचीही कारवाई सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ३४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून अनाधिकृत बॅनर जप्तीची कारवाई मनपाने सुरू केली आहे.महानगरपालिकेने शहरातील अनेक क्षेत्रात फेरीवाल्यांना बंदी घातली आहे. मात्र अनेक फेरीवाले बंदी असलेल्या क्षेत्रातही रस्त्याचे कडेला दुकाने लावून व्यवसाय करतात. यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाने अनेकदा फेरीवाल्यांना नोटीस बजावून दुकाने हटविण्याचे सूचित केले होते. परंतु फेरीवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपाने कारवाईचा बडगा उभारला आहे.गेल्या एक महिन्यात ५० फेरीवाल्यांवर कारवाई करून २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच विनापरवानगी शहरात लागलेले बॅनर हटविले जात आहे. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे बंडू चहारे, अनिल निकोडे, गणपत चहारे, विक्रम महातव, अनिल खोटे, मनीष शुक्ला आदी कर्मचारी करीत आहे.फुटपाथ रिकामे करण्याचे आदेशवाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला दुकाने लावू नये अन्यथा अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी ५०० रुपयांचा दंड टाळण्यासाठी फुटपाथवर दुकाने लावू नये, असे आवाहन अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष ठोंबरे यांनी केले आहे.