शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील मजुरांचा उघड्यावर संसार

By admin | Updated: November 22, 2014 22:58 IST

पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून

जिवती : पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून आपल्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत आहे. परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने गरीब व कोरडवाहू शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांनीे राहायचे कुठे? पोट भरायचे कसे? जगायचे कसे? संसार सांभाळायचा कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत.ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजूर काम मिळेल तिथे झोपड्या तयार करुन आपले वास्तव्य करतात. आपली आर्थिक बाजू बळकट व्हावी. यासाठी दिवसरात्र काम करून संसाराचा गाडा चालवितात. संसाराचा गाडा चालविताना मुलाबाळांचा साभाळं कोण करणार. त्यांना कोण शिकविणार म्हणून शाळेत शिकत असलेली बालकेही सोबतीला घेऊन जात असल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. ना घर ना रस्ता, ना शिक्षण, ना वीज, ना आरोग्याच्या सोयी त्यांना मिळतात. हे सर्व विसरुन एखाद्या ठेकेदाराच्या आश्रयाखाली झोपड्या तयार करुन संसार करण्याची पाळी माणिगकड पहाडावरील मजुरांवर आली आहे. दरवर्षी होणारा निसर्गाचा कोप, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान यावर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पहाडावर दलित आदिवासी, बंजारा समाज अधिक आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांनाच मजूर म्हणून राबण्याची पाळी आली आहे. एकीकडे शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबवून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे, तर दुसरीकडे पोटाची खडगी भरण्यासाठी पालक आपल्या मुलाला सोबत घेऊन स्थलांतरित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मराठवाड्यातील लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक, नांदेड आदी जिल्ह्यात मजुरांना ऊस तोडणीचे काम नियमित मिळत असून रोजीसुद्धा समाधानकारक मिळते. पेरणीपूर्व ठेकेदाराकडून पैसे घेणे आणि दिवाळीनंतर कामाला जाणे, हा त्यांचा हंगाम ठरलेला आहे. दिवसरात्र शेतात राबराब राबूनही हाती काहीच पडत नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे.