शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:22 IST

कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरांची मागणी। ग्रामसभांनीही घेतला सावध पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहे. परंतु, ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही तर तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट एखाद्या ठेकेदाराला देतात. तेंदूपत्ता व्यवसायात कंत्राटदाराला तोटा झाल्यास मजुरी व रॉयल्टी देत नाही. याचा अनुभव जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांना अनेकदा आला आहे. मागील वर्षी तर अनेक कंत्राटदारांनी मजुरीच दिली नाही. १५ दिवस उन्हात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरीवर पाणी फेरावे लागले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मात्र कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजूरी दिली नाही. तेंदूपत्त्याचा बाजार अस्थिर असतो. याचा फटका तेंदूपत्ता कंत्राटदाराला बसतो. यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदाराला फटका बसल्यास मजुरी बुडण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे मजुरी दिल्याशिवाय बाहेर गावाहून तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले मजूर जाण्यास तयार नाहीत.गतवर्षी कंत्राटदारांनी रायल्टी बुडविली होती. त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार रॉयल्टीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तेंदूपत्त्याची उचल करू न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे धाबा, गोंडपिपरी परिसरातील कंत्राटदारांची गोची झाली आहे. मागील वर्षी काही ग्रामसभांनी कच्चे करारनामे केले होते. त्याचा फटका ग्रामसभांना बसला होता. यावर्षी काही ग्रामसभांनी नोंदणीकृत करारनामे केले तर काही ग्रामसभांनी मात्र मागील वर्षीप्रमाणे साधे करारनामे केले आहेत. याचा फटका सदर ग्रामसभांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामसभा व्यावहारीक सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येते.खरीप हंगामासाठी पैशाची गरजजिल्ह्यातील चार तालुक्यात तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यातील काही गावांचे तेंदूपत्ता संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मजूर तेंदूपत्त्याचा हंगाम आटोपून घराकडे परतत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून कमावलेला पैसा शेतीसाठी खर्च केला जातो. खरीपपूर्व मशागतीच्या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. तेंदूपत्ता संकलनानंतर कंत्राटदार तेंदूपत्ता वाळवून वाळलेला तेंदूपत्ता गोदामात ठेवतात. त्यामुळे तेंदूपत्ता वाहतुकीला सुरुवात झाली आहे. यातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग