चंद्रशेखर बावनकुळे : सत्कार समारंभात युवकांना सल्लाचंद्रपूर : २१ वे शतक हे नुसते पदवी घेण्याचे नसून आपली योग्यता सिद्ध करण्याचे आहे. त्यामुळे तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे. पदवी घेण्याऐवजी कौशल्य विकासाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरातील युवकांना दिला.तेली समाज आरक्षण संघर्ष समितीतर्फे जटपुरा गेट पंचतेली समाज भवन हनुमान मंदिर चंद्रपूर येथे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर तसेच तेली समाज आरक्षण समितीचे संयोजक योगेश समरीत, प्रकाश देवतळे, शोभाताई पोटदुखे, प्रकाश लोणकर, पांडुरंग आंबटकर, अॅड. मोगरे, सूर्यकांत खनके, राजेश रघाताटे आदी मंचावर होते. विदर्भातील मागास व ओबीसी समाजाला राज्याच्या मंत्रिमंडळात चांगली खाती मिळाल्याबद्दल या मेळाव्यात आनंद व्यक्त करण्यात आला. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संताजी जगनाडे महाराजाचे नाव देण्याची व तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने आरक्षणाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.समारंभाचे संयोजक योगेश समरीत यांनी पाहुण्यांच्या स्वागतपर भाषणात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याकडे लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांना योग्य सुधारित दर, नोकऱ्या मिळाव्या अशा आशयाची मागणी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली. कार्यक्रमाला शैलेश जुमडे, जितू इटनकर, छब्बु वैरागडे, मीनाक्षी गुजकर, कामडे, वैरागडे, शीतल इटनकर, अशोक सातपुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अविनाश यांनी केले. यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)
पदवीऐवजी कौशल्य विकासाकडे लक्ष द्या
By admin | Updated: October 15, 2015 01:14 IST