शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी रुग्णांची हेळसांड

By admin | Updated: August 25, 2015 01:15 IST

सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात तिनच वैद्यकीय

मूल : सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात तिनच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर ५० खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय सुरू आहे. सध्या साथीचे रोग असल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांची चांगलीच हेळसांड होत असून संपात व्यक्त केला जात आहे.जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने मूल येथे ५० खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय बांधण्यात आले. मात्र गेल्या १२ वर्षांपासून योग्य सेवा पुरविण्यास उपजिल्हा रुग्णालय अपयशी ठरला आहे. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे राहात असल्याने रुग्णांवर योग्य उपचार केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या स्थितीत नऊ पैकी तीन वैद्यकीय अधिकारी तर अधिपरिचारीका १२ पैकी चारच कार्यरत आहेत. बाह्य रुग्ण सेवेत सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ५ अशा वेळात रुग्णांची तपासणी करुन उपचार केला जातो. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेटलतिफपणामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. २४ आॅगस्टला प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारल्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्याची ड्युटी असताना, वैद्यकीय अधिकारी डॉ. लाडे मात्र तब्बल पाऊन तासांनी म्हणजे ४ वाजून ४५ मिनीटांनी रुग्णालयात आले. तोपर्यंत पाऊन तास रुग्ण ताटकळत उभे दिसून आले. हिच स्थिती आंतर रुग्णात सुद्धा होती. रुग्णालयात बेडवर रुग्ण असताना देखील वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर आढळले नाही. एखाद्या वेळेस अनर्थ घडला तर वैद्यकीय सेवा मिळणार काय, असा प्रश्न जनतेनी केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास मूलचे उपजिल्हा रुग्णालय अपयशी ठरल्याचा आरोप होत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)