शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांचे नातेवाईकच बनले सलाईन स्टॅन्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:58 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने अनेकदा उघडकीस आणला. यानंतर वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. मात्र, अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने रुग्णालयातील समस्या कायम आहेत. दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईकच चक्क सलाईन स्टॅन्ड बनल्याचे चित्र शनिवारी ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून ...

ठळक मुद्देभोंगळ कारभार चव्हाट्यावर : जिल्हा सामान्य रूग्णालयातील संतापजनक प्रकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने अनेकदा उघडकीस आणला. यानंतर वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. मात्र, अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने रुग्णालयातील समस्या कायम आहेत. दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईकच चक्क सलाईन स्टॅन्ड बनल्याचे चित्र शनिवारी ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आहे. त्यामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर नामांतर झाले. यामुळे सुविधात वाढ होईल, अशी रुग्णांना अपेक्षा होती. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र, रुग्णांना सुविधा पुरविण्यात रुग्णालय प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्याने अनेकदा रूग्ण फरशीवर गादी टाकून उपचार घेताना दिसतात. तर शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत सलाईन स्टॅन्ड अभावी रुग्णांचे नातेवाईकच सलाईन हातात घेवून स्टॅन्डसारखे बेडजवळ उभे असल्याचे दिसून आले. याबाबत अधिक चौकशी केली असता, सलाईन स्टॅन्डच उपलब्ध नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेवून रुग्णालयातील भोंगळ कारभार दूर करण्याची मागणी रुग्णांकडून होत होती.अस्वच्छतेमुळे प्रचंड मनस्तापरूग्णालयातील अस्वच्छतेमुळे रूग्ण व नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खाटांअभावी अनेकदा खाली झोपून उपचार घ्यावे लागते. कधी तर मोकाट कुत्रे व जनावरांचाही येथे वावर दिसून येत असल्याने अस्वच्छता पसरली आहे.