शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

रेमडेसिविर’ इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे कुटुंबीय रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:25 IST

राजेश मडावी चंद्रपूर : कोरोनामुळे फुफ्फुपुसाला किती संसर्ग झाला हे एचआरसीटी अहवालातील स्कोअरनुसार रुग्णाला ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन द्यायचे की नाही, ...

राजेश मडावी

चंद्रपूर : कोरोनामुळे फुफ्फुपुसाला किती संसर्ग झाला हे एचआरसीटी अहवालातील स्कोअरनुसार रुग्णाला ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन द्यायचे की नाही, हे ठरविले जाते. मात्र, शहरातील काही खासगी कोविड रुग्णालयांनी ट्रीटमेंट प्रोटोकॉल धाब्यावर बसूवन सौम्य स्थितीतील रुग्णांनाही इंजेक्शन अत्यावश्यक असल्याचे सांगणे सुरू केले. त्यामुळे इंजेक्शनासाठी धावाधाव करणाऱ्या कोरोना रुग्णांचे कुटुंब रडकुंडीला आले आहेत.

कोरोना बाधित रुग्णाला न्युमोनियासारखा आजार झाल्यास प्रकृतीत गंभीर समस्या निर्माण होतात. रुग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन जीवनदान देणारी ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीरला मान्यता दिल्यानंतर राज्यात ३० जून २०२० पासून हे इंजेक्शन देणे सुरू झाले आहे.

एचआरसीटी रिपोर्टकडे कानाडोळा

कोरोनामुळे फुफ्फुसाला किती संसर्ग झाला हे एचआरसीटी अहवालातून माहिती मिळते. संसर्गाचा स्कोअर २५ आहे. २५ पैकी स्कोअर ५ असेल तर संबंधित रुग्ण गंभीर नाही. हा स्कोअर ६ च्या पुढे असेल तर रुग्ण गंभीर ठरतो. अशा रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. मात्र, या अहवालाकडे दुर्लक्ष करून काही खासगी कोविड रुग्णालयांनी ५ स्कोअरच्या आतील रुग्णांसाठीही इंजेक्शनची शिफारस करत आहेत, अशी माहिती एका कोविड रुग्णाच्या कुटुंबाने ‘लोकमत’ला दिली.

जनऔषधी केंद्रासमोर इंजेक्शनसाठी रांग

चंद्रपुरातील रेडक्राॅस भवनातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राला आज ९० इंजेक्शन मिळाले. कोविड खासगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन टोचणे अत्यावश्यक असल्याचे कुटुंबीयांना सांगितले जात आहे. त्यामुळे सोमवारी या रेडक्राॅस भवनातील केंद्रासमोर मोठी रांग लागली होती.

फक्त ६१० इंजेक्शन उपलब्ध

मंगळवारी चंद्रपुरातील रेडक्राॅस भवन जेनेरिक औषधी केंद्रात ९०, पंत हॉस्पिटल २८० व तुकूम परिसरातील क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये २४० असे एकूण ६१० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले. दोनही खासगी हॉस्पिटलनी हेट्रो हेल्थ केअर कंपनीकडून हे इंजेक्शन थेट विकत घेतले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

तुटवडा असताना डॉक्टरांकडून शिफारस कशाला?

शहरात रेमडेसिविर उपलब्ध नसताना खासगी रुग्णालयांकडून याच इंजेक्शनची शिफारस केली जात आहे. रुग्ण जर अतिशय गंभीर असेल तर इतरत्र अथवा शासकीय कोविड रुग्णालयात हलवा, असे न सांगता इंजेक्शनच आणा, असा तगादा लावला जात आहे. त्यामुळे रुग्णाचे कुटुंबीय घाबरून मेडिकल स्टोअरची भटकंती करीत आहेत, हा प्रकार योग्य नाही. तुटवडा असताना याच इंजेक्शनची डॉक्टरांकडून शिफारस कशाला, असा प्रश्न एका औषध विक्रेत्याने विचारला आहे.

कोट

कोविड रुग्णाला गरज नसताना रेमडेसिविर दिले जात असेल तर हे चुकीचे आहे. गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन परिणामकारक आहे. कोविड रुग्णालय म्हणून परवानगी मिळालेल्या खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून इंजेक्शन विकत घेता येते. तशा सूचनाही दिल्या होत्या. काही रुग्णालये विकत घेत आहेत. असे झाल्यास रुग्णाच्या कुटुंबीयांना इतरत्र भटकावे लागणार नाही.

-निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

कोट

उपलब्धतेनुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच रेमडेसिविर इंजेक्शन वितरण केले जात आहे. इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये व गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन मिळावे, याकडे गंभीरतेने लक्ष दिले आहे.

- सी. के. डांगे, निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर