शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

अर्थसंकल्पातून गवसणार उन्नतीचा मार्ग

By admin | Updated: March 19, 2015 00:58 IST

भाजप-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्याला चांगले काही मिळेल अशी जिल्ह्यावासीयांची अपेक्षा होती.

चंद्रपूर : भाजप-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्याला चांगले काही मिळेल अशी जिल्ह्यावासीयांची अपेक्षा होती. त्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण झाल्या असून जिल्ह्यातील अनेक प्रकल्प व विकास कामांसाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये शासनाने केली आहे. अर्थसंकल्प सादर होताच राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी जिल्ह्याच्या पदरी निराशाच येत होती. मात्र, यावेळेस सरकार बदलल्याने भाजप-शिवसेना युती शासनाच्या पहिल्या अर्थसंकल्पात व राज्याचे वित्तमंत्री हे स्वत: जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार असल्याने जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतुद होईल, अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा आज काही प्रमाणात पूर्ण झाली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात चिमूर तालुक्यातील गोंदोडा तपोभूमीच्या विकासासाठी निधीची घोषणा केली. या तपोभूमीत दरवर्षी यात्रा भरत असते. मात्र निधीअभावी येथे सुविधा निर्माण झालेल्या नाही. त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या तपोभुमीच्या विकासाठी निधीची तरतुद अर्थसंकल्पात झाली आहे. तसेच चांदा ते बांदा पर्यटन विकासार्तंगत जिल्ह्यातील बल्लारपूर येथे बंगळुरुच्या धर्तीवर वनस्पती उद्यान विकसीत करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी व विमानतळ धावपट्टीच्या विकासासाठी निधीची तरतुद आज झाली. देशात व राज्यात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मसाईमारासारखे आंतराष्ट्रीय दर्जाचे वनपर्यटन केंद्र विकसीत व्हावे यासाठी निधीची तरतुद करण्यात आली. आदिवासी समाजाचे क्रांतीकारी शहीद वीर बाबुराव शेडमाकडे यांचा स्मारक चंद्रपुरात उभारण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होती. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक चंद्रपुरात उभारण्यासाठी अर्थसंकल्पात आज निधीची तरतुद करण्यात आली. तसेच जिल्ह्यात मंजूर बहुप्रतीक्षीत मेडीकल कॉलेज निधीअभावी रेंगाळते की काय, अशी अनेकांना भिती होती. मात्र, या कॉलेजसाठी आजच्या अर्थसंकल्पात निधीची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करून वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सूकर करून दिला.तसेच जिल्ह्यातील बांबु कारागिरांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी वनावर आधारीत बांबु प्रकल्प स्थापनेचा मार्गही मोकळा झाला. या बांबू प्रकल्पाची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही महिन्यांपूर्वी चंद्रपुरातच केली होती. हा प्रकल्प उभारण्यासाठी निधीची घोषणा अर्थसंकल्पात झाली. (स्थानिक प्रतिनिधी)