शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रांतीय अधिवेशनात अनेक ठराव पारित

By admin | Updated: March 1, 2016 00:43 IST

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अधिवेशन स्थानिक विद्यानिकेतन माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडले.

चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अधिवेशन स्थानिक विद्यानिकेतन माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडले. विदर्भभरातून आलेल्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांच्या सहभागामुळे, हे अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे. शिक्षकांच्या मुळ प्रश्नाला हात घातल्यामुळे आणि वेळोवेळी अमरावती, नागपूर उपसंचालकाच्या कार्यालयातून जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत झालेल्या आंदोलनामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या प्रतिसाद मिळाला.या प्रांतीय अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा म.रा. माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष व्ही.यू. डायगव्हाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, प्राचार्य डॉ. शरयु तायवाडे, प्राचार्य नितीन जुनोनकर, संध्या इंगळे, दत्तात्रय मिर्झापुरे, जगदीश जुनगरी हे होते. वि.मा.शि. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, अध्यक्ष श्रावण बरडे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मार्गदर्शन केले.प्रांतीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिक्षक-विद्यार्थी हितविरोधी शासन धोरण, घातक, शासन निर्णयाबाबत संघटनेची भूमिका या विषयावर विविध मान्यवरांचे चिंतनपर व्याख्यान झाले. या चर्चासत्रामधून शासनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबद्दलचे उदासीन धोरण स्पष्ट झाले. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक. संघाची आमसभासुद्धा या अधिवेशनादरम्यान पार पडली. सन २००८ ते २०१६ पर्यंतच्या अहवाल सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सभेत सादर केले व विषयानुरुप सभेत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते सर्व ठराव पारित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे तर पहिल्या सत्राचे उद्घाटक माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे हे होते. संचालन सुनील शेरकी तर आभार दिगांबर कुरेकार यांनी मानले.प्रास्ताविक सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले. प्रमुख पाहुणे अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, प्राचार्य बबनराव तायवाडे, डॉ. शरयू तायवाडे, प्रा. नितीन जुनोनकर, दत्तात्रय मिर्झापुरे, संध्या इंगले, जगदिश जुनगरी यांचेही या निमित्ताने मार्गदर्शन झाले.संचालन श्रीहरी शेंडे यांनी तर आभार श्रावण बरडे यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्याकरिता प्रांतीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्याचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती संघटेनचे पदाधिकारी प्रभाकर पारखी यांनी दिली. (प्रतिनिधी)