संजय धोटे: समर्पित कार्यकर्ते हीच पक्षाची ताकदलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा: स्थानिक सम्राट हॉल येथे आ. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याकरिता कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या संपूर्ण तालुक्यातील जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, तालुकाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आ. धोटे यांनी पुणे येथे झालेल्या बैठकी विषयी माहिती दिली. त्यानंतर सर्व पदाधिकार्याकडून सूचना मागितल्या. आ. धोटे म्हणाले की, सर्वांनी राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन समर्पित भावनेने काम करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे. पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला जि.प. सभापती गोदावरी केंद्रे,गोंडपिपरी पंचायत समिती सभापती दीपक सातपुते, जवती पंचायत समिती सभापती सुनील मडावी, नगर उपाध्यक्ष चेतन गौर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर, राजुरा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व भाजपा नेते सतीश धोटे, कोरपना संजय गांधी निधार योजनेचे अध्यक्ष संजय मुसळे, जिल्हा सचिव अरुण मस्की व नारायण हिवरकर, भाजपा नेते रमेश मालेकर, ज्येष्ठ नेते दीपक बोनगिरवार, राजुरा तालुकाध्यक्ष व जि.प. सदस्य सुनील उरकुडे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बादल बेले बुरटकर, अनिल दुबे,सुरेश धोटे, बंडू बोढे, अमित जयपूरकर, उमेश मारशेट्टीवार, आशिष करमरकर, कैलास कार्लेकर, फिरोज पठाण, पराग दातारकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. संचालन शहराध्यक्ष बादल बेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन भाजयुमो तालुका महामंत्री बुरडकर यांनी केले.
राजुऱ्यात पक्ष संवाद कार्यक्रम
By admin | Updated: May 6, 2017 00:42 IST