शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सहभाग घ्या

By admin | Updated: January 26, 2017 01:31 IST

देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील

 आशुतोष सलील : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस चंद्रपूर : देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नागरिकांनी आपण स्वत: व आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदानात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अर्जून चिखले व उपविभागीय अधिकारी भानुदास गायकवाड उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्त्याने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फतीने शहरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला, परिसंवाद स्पर्धा व दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख बक्षित देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी १८ ते १९ वयोगटातील नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांना बिल्ले लाऊन छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्राचे प्रदर्शन या कार्यक्रमात लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अर्जून चिखले यांनी तर संचालन नायब तहसिलदार डॉ.कांचन जगताप यांनी केले. आभार तहसिलदार आशिष वानखेडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)