शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रक्तदान करून समाजकार्यात सहभागी व्हा!

By admin | Updated: June 12, 2016 00:46 IST

रक्तदानाचे महान कार्य करीत असतानाच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून समाजकार्यात उर्त्स्फुत सहभागी व्हावे,

बाबासाहेब वासाडे यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्तदान शिबिरमूल : रक्तदानाचे महान कार्य करीत असतानाच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून समाजकार्यात उर्त्स्फुत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिक्षण महर्षी अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवभारत विद्यालय मूल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ते बोलत होते.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोगरे, कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजाबराव वानखेडे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष ते.क. कापगते, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष जयश्री चन्नुरवार, प्रा.किसन वासाडे, प्रा.सुखदेव चौथाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर अध्यक्ष ममता गोजे आदी उपस्थित होते.अ‍ॅड. वासाडे पुढे म्हणाले, शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस देशात काम करीत असून जोपर्यंत गरीब माणसाच्या उत्पन्नात वाढ होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नसल्याचे भाकीत त्यांनी यावेळी बोलून दाखविले.नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष नाना महाडोळे यांनी सर्वप्रथम रक्तदान केले. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तगट तपासणीचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केले. उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय गजपूरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश ठाकरे, महेश कटकमवार, शामू उराडे, विनोद कामडी, विकास गेडाम, प्रदीप वाळके, सुनील कामडी यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)