शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वरोऱ्यातील खासगी सोनोग्रॉफी सेंटर मालामाल

By admin | Updated: May 14, 2016 00:49 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाखो रुपये खर्च करून शासनाने ‘सोनोलाजिस्ट’ ही सोनोग्रॉफी मशीन खरेदी केली. मात्र ही मशीन सतत बंद असते.

गरीब रूग्णांची आर्थिक लूट : उपचार न करताच खासगी रुग्णालयात केले जाते रेफर वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाखो रुपये खर्च करून शासनाने ‘सोनोलाजिस्ट’ ही सोनोग्रॉफी मशीन खरेदी केली. मात्र ही मशीन सतत बंद असते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील महिलांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाण्यासाठी सहीनिशी व ‘त्या’ दवाखान्याच्या चिठ्ठीवर नमूद करून पाठविले जाते. यातून शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून सोनोग्राफी सेंटरचे मालक मात्र मालामाल होत आहेत. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात राज्य शासनाने अनेक महागड्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयात तालुक्यातील गर्भवती महिला उपचारासाठी येतात. महिलांची सोनोग्राफी करणे अनिवार्य असते. परंतु रुग्णालयात सोनोलॉजिस्ट तज्ञ नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी त्यांना खासगी रुग्णालायतील सोनोग्राफी सेंटरला जा, असे सांगत त्या रूग्णालयाची चिठ्ठी लिहून देत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून ग्रामीण रूग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. येथील रुग्णालयात येणारे रूग्ण हे ग्रामीण भागातील व गरीब असून त्यांना खासगी सोनोग्राफी सेंटरवर तपासणी करणे परवडणारे नाही. मात्र तरीही नाईलाजास्तव खासगी रूग्णालयाची वाट धरावी लागत आहे. ही बाब गंभीर असून या ठिकाणी नियमीत सोनोलॉजिस्टची गरज असून रूग्णालयात होणारी रुग्णांची हेळसांड व आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)वैद्यकीय अधिकारीच देताच खासगी रूग्णालयाची चिठ्ठीदर बुधवारी गर्भवती महिलांची तपासणी करीत असताना काही वैद्यकीय अधिकारी हे आपल्या टेबलवर रुग्णालय किंवा खासगी दवाखान्याचे लेटरपॅड ठेवून बसतात. त्यानंतर तपासणीसाठी आलेल्या महिलेला ‘तुम्हाला सोनोग्राफी खासगी रुग्णालयातच करावी लागेल’ असे सांगत असतात. तर गोपनीय माहितीनुसार येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘त्या’ खासगी सोनोग्राफी सेंटर चालकांकडून आर्थिक लाभ मिळत असल्याची माहिती आहे.