झाडामुळे उड्डाणपुलाला धोका
चंद्रपूर : वरोरा नाका परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर झाडे उगवल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सदर पुलावरील झाड तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
स्वच्छतेअभावी नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डात घाणीचे साम्राज्य आहे. बिनबा वॉर्डातील नाल्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने येथे स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे
वधू-वरांच्या स्वप्नांचा चुराडा
चंद्रपूर : विवाह म्हटला की, वर-वधूंसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, विवाहानंतरचे अनेक प्लॅन विवाह जुळलेले वर-वधू लग्नापूर्वीच ठरवून ठेवतात. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्वच विवाह सोहळे स्थगित करण्यात आले तर काहींनी थोडक्यात कार्यक्रम करून विवाह उरकला. यावर्षी मात्र विवाह जुळलेल्या युवक-युवती तसेच आप्तेष्ट व नातेवाईक या सर्वांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडले आहे.
कोरोनाचे पडसाद सर्वच क्षेत्रांत नकारात्मक पद्धतीने उमटले आहे. लग्नसोहळ्याचे मंगल सूरसुद्धा बेसूर झाले आहेत.