लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरानजीकच्या मौजा बोर्डा येथील लिटील ऐंजल्स कॉन्व्हेंटबाबत पालकांनी शिक्षण विभागास अनेक तक्रारी दिल्या, आंदोलने केली. परंतु, या कॉन्व्हेंटवर शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आज शुक्रवार २ जूनला वरोरा पं.स. शिक्षण कार्यालयास घेराव घालणार असल्याची माहिती पालकांच्या वतीने माजी जि.प. सदस्य नितीन मत्ते यांनी दिली.लिटील ऐंजल्स कॉन्व्हेंट बोर्डा यांच्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागास वारंवार तक्रारी दिल्या. या तक्रारीनंतर शिक्षण विभागाच्या अधिकऱ्यांनी तपासणी करून आपला अहवाल वरिष्ठ विभागात पाठविला आहे. परंतु, ठोस अशी कारवाई अजूनही करण्यात आली नाही. त्यामुळे माजी जि.प. सदस्य नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्यात आले. परंतु, पालकांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालकांना न्याय मिळवून देण्याकरिता शिक्षण विभागाला घेराव घालणार आहेत.
शिक्षण विभागाला पालकांचा आज घेराव
By admin | Updated: June 2, 2017 00:45 IST