शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा प्रशासनाविरोधात पालकांचा एल्गार

By admin | Updated: June 5, 2016 00:40 IST

वरोरा शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता मात्र या शहरात शिक्षणाचा गोरखधंदा सुरु झाला असून शिक्षण शुल्काच्या नावाने अवाढव्य पैशाची मागणी ....

प्रकरण पोलिसात : शिवाजी विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकारवरोरा : वरोरा शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता मात्र या शहरात शिक्षणाचा गोरखधंदा सुरु झाला असून शिक्षण शुल्काच्या नावाने अवाढव्य पैशाची मागणी करणाऱ्या तसेच विद्यार्थ्याना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात पालकांनी एल्गार पुकारला. जोपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका देणार नाही तोपर्यंत वर्गात बसणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यानी घेतल्यामुळे खळबळ उडाली. शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापनावर काय कारवाई करते, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून वरोरा शहरातील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून खासगी शिकवणी वर्ग सुरु आहे. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व या शिकवणी वर्ग संचालकाच्या तोंडी करारानुसार पूर्ण शिकवणी वर्ग घेणार असून विद्यार्थ्याचा प्रवेश मात्र शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात होणार होता, असे पालकांचे म्हणणे आहे.आता निकाल लागल्यानंतर शनिवारी विद्यार्थी व पालक शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका मागायला गेले असता क्लिअरन्सच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून अडीच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास टीसी मिळणार नाही, अशी ताकीद महाविद्यालयाच्या अध्यक्ष रजनी लांबट यांनी दिली होती. मात्र पालकांनी याला विरोध दर्शवून पैसे भरण्यास नकार दिला. शेवटी प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पोलीस निरीक्षकांना पालकांनी सर्व प्रकार सांगितला. परंतु हे प्रकरण शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळे पंचायत समितीमध्ये जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. संतापलेल्या पालकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन सभापती सुनंदा जीवतोडे यांना निवेदन देत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष देत शाळेकडे कूच केली. शुल्क न घेता गुणपत्रिका व टीसी देण्याची मागणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)