शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पानतावणे यांचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:14 IST

अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे कार्य साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या लेखनीला आंबेडकरी विचारांची जोड दिली.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : विविध संघटनांकडून श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे कार्य साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या लेखनीला आंबेडकरी विचारांची जोड दिली. हे ऐतिहासिक कार्य अथक परिश्रमातून कृतिप्रवण केले, या शब्दात पानतावणे यांचा गौरव केला. आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशनच्या वतीने पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्षस्थानी पी. व्ही. मेश्राम तर मंचावर प्रवीण खोब्रागडे, खुशाल तेलंग, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. मेघमाला मेश्राम, डॉ. प्रमोद शंभरकर, कोमल खोबरागडे, डॉ. इसादास भडके आदी उपस्थित होते.अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यानंतर काय? असा प्रश्न डॉ. बन्सोड यांनी उपस्थित केला. ‘अस्मितादर्श’ अव्याहतपणे सुरू ठेवणे गरजेचे असून यातूनच प्रबोधनाची व्याप्ती वाढणार आहे. डॉ. मेश्राम यांनी यांनीही आंबेडकरी चळवळीतील योगदानाचे मूल्य अधोरेखित केले. अस्मितादर्शने आंबेडकरी चळवळीला बळ दिले, असे मत खोबरागडे यांनी मांडले. पानतावणे यांचे चंद्रपूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज खोबरागडे यांनी नोंदविली. पानतावणे यांनी वादळाच्या वंशजांचा शोध घेवून विद्रोहाचे पाणी पेटवले, अशी भूमिका तेलंग मांडली. य् अस्मितादर्शने अनेक पिढ्या घडविल्या. परिवर्तनाची व्याप्ती वाढविली, असे निरीक्षण डॉ. शंभरकर यांनी नोंदविले. सभेचे संयोजक डॉ. भडके यांनी पद्मश्री पानतावणे यांच्या कार्याचा गौरव केला शुद्धोधन मेश्राम यांनी संचालन केले. नागेश सुखदेवे यांनी आभार मानले. यावेळी विलास दुर्गे, प्रा. डॉ. रविंद्र मुरमाडे, ताराबाई मेश्राम, त्रिलोक शेंडे, सुरेश रामटेके, गोपी मित्रा, राजाभाऊ खोबरागडे, सीमा भसारकर, बी.सी. नगराळे, अंकुश वाघमारे, प्रा. अशोक बन्सोड, नितीन रामटेके उपस्थित होते.