शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशत; पत्नीच्या समोर वाघाने शेतकऱ्याला ओढून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 19:02 IST

Chandrapur News शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतक?्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते.

ठळक मुद्देतीन बिबटे जेरबंद केल्यानंतर आता वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतकऱ्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते. ही थरारक घटना बुधवारी सकाळी सावली वनपरिक्षेत्रांतर्गत पाथरी उपक्षेत्रातील गेवरा बीटमधील गेवरा खुर्द शिवारात घडली. शालिक चापले (४५) असे मृतकाचे नाव आहे. (Panic; The tiger dragged the farmer in front of his wife)शालिक पत्नीसह स्वत:चे वैनगंगा नदी परिसरातील शेतात गवत कापायला गेले होते. परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घेतली. पत्नीने पतीला वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी आरडाओरड करून शेजारच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली. मात्र, तोपर्यंत वाघाने शालिक यांना फरपटत नेत ठार केले होते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.सावली वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या वाढलीसावली वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या वाढलेली आहे. मात्र, संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ आहे. वाघाचा मानवी वस्ती व शेतशिवारात वावर वाढला आहे. अलीकडेच सावली तालुक्यात वन विभागाने तीन बिबट्यांना जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असताना आता वाघाने दहशत निर्माण केली आहे

टॅग्स :Tigerवाघ