लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कठडे नसलेल्या विहिरीत पडून दोन अस्वल व दोन पिल्लांचा मृत्यू झाला. दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना सकाळी उघड झाली आहे. ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वाढोली येथील शेतात ही विहीर आहे. रात्रीच्या सुमारास अस्वलांच हे कुटुंब या विहिरीत पडले असावे, अशी शक्यता आहे..शेतात काही लोक गेले असताना त्यांना हे दृश्य दिसले. ताडोबात पाण्याचा शोध घेत नेहमीच प्राणी जंगलाबाहेर बाहेर पडतात. पाण्याच्या शोधात फिरत असतानाच ही घटना घडल्याची शक्यता अधिक आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}