शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांकडून अधिक रक्कम घेण्याची चौकशी

By admin | Updated: August 11, 2015 01:43 IST

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मागील काही दिवसांपासून रुग्णाकडून अधिकची रक्कम घेत नमूद रक्कमेची पावती दिली

वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मागील काही दिवसांपासून रुग्णाकडून अधिकची रक्कम घेत नमूद रक्कमेची पावती दिली जात होती. रुग्णाकडून अधिक रक्कम घेतली जात असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर या संपूर्ण प्रकाराची ११ आॅगस्ट रोजी समिती मार्फत चौकशी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्रान्वये आदेश दिल्याने रुग्णाकडून अधिकची रक्कम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणारे सिकलसेलग्रस्त, अपंग व इतर रुग्णाकडून शासन नियमाचे उल्लंघन करून रक्कम घेतली जात होती. हा प्रकार मागील काही महिन्यापासून सुरू होता. वरोरा तालुक्यातील दहेगाव येथील अनाथ व अपंग असलेल्या अमोल दरशथ डाहुले यांच्याकडूनही अधिकची रक्कम उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने घेतली होती. ही बाब वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक छोटू शेख यांना कळताच त्यांनी अपंग अमोलला घेवून उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. डब्ल्यू. भगत यांची भेट घेतली. अपंग व्यक्तीकडून घेतलेली अधिकची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याने परत केली. यानंतर छोटू शेख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरीता एक समिती नेमली असून ही समिती ११ आॅगस्टला वरोरा येथे येवून संबंधिताने बयाण नोंदवून घेणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना सादर करणार आहे. यामध्ये कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुग्णांकडून अधिकची रक्कम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या चौकशी समितीमुळे तुर्तास धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)