शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यात शुद्ध पाण्याचे एटीएम देणार

By admin | Updated: May 6, 2017 00:41 IST

पोंभुर्णा तालुक्यातील शुद्ध पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.

सुधीर मुनगंटीवार : पाणी व स्वच्छता पार्कचे लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील शुद्ध पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. या तालुक्यामध्ये गावांना आरोच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केले.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे. तसेच शौचालय, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन या संदर्भातील आदर्श व्यवस्थेची तोंडओळख व्हावी, यासाठी पोभुर्णा पंचायत समिती कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या पाणी व स्वच्छता पार्क लोकार्पण सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. या पार्कच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे लोकशिक्षण होईल. स्वच्छता अभियानातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर मनपाच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, भोंभुर्णा पंचायत समिती सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन गावांगावात होणे आवश्यक असून त्याकरिता आदर्श शौच खड्डयांची निर्मिती करण्यात यावी. शरीरातील ९५ टक्के आजार हे अशुध्द पाण्यामुळे होतात. त्यामुळे स्वच्छतेसोबतच आरोग्यदायी पेयजलाची प्रत्येकाला आवश्यकता असते. जिल्हयातील दोन गावांमध्ये आरोच्या पाण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथे आरो पाण्याचे एटीएम उघडण्यात आले आहे. त्यामुळे गावातील आजारांवर नियत्रण आले आहे. पोंभुर्णा भागातील पाण्याची प्रत चांगली नसलेल्या ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ पाणी पुरवठयासाठी जिल्हा परिषदेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्युत सोलरपंप व अन्य आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रस्ताव द्यावा. राज्यातील आरोयुक्त पाण्याचा पुरवठा केला जाणारा तालुका पोंभुर्णा असेल, असे आश्वासन पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.