शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

पोंभुर्णा क्षेत्र राईस क्लस्टर म्हणून विकसित करणार

By admin | Updated: May 7, 2016 01:29 IST

‘चांदा ते बांदा’ असा संसाधनावर आधारित आराखडा कार्यक्रमांतर्गत पोंभुर्णा क्षेत्रात राईस क्लस्टर विकसित करुन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे ...

सुधीर मुनगंटीवार : तालुका विकास आराखडा, रोजगार निर्मितीवर भरपोंभुर्णा : ‘चांदा ते बांदा’ असा संसाधनावर आधारित आराखडा कार्यक्रमांतर्गत पोंभुर्णा क्षेत्रात राईस क्लस्टर विकसित करुन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पोंभुर्णा येथे तालुका विकास आराखडा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, सभापती देवराव भोंगळे, सभापती बाबूजी चिंचोलकर, नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार व भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पोंभुर्णा तालुका विकास आराखडा सर्वंकष व विकासाभिमुख तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी, सिंचन, रोजगार, रस्ते, शिक्षणाला या आराखड्यात प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पोंभुर्णा परिसर धानाचा भाग असल्यामुळे राईस क्लस्टर निर्माण करुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येईल, असे ते म्हणाले. येत्या तीन वर्षात या भागात बंधारे बांधून सर्व माजी माजगुजारी तलावाची दुरुस्ती करण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून पोंभुर्णा तालुका व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान घेतले जाते. पोंभुर्णा, मूल, बल्लारपूर व कोठारी या भागातील शेतकऱ्यांसाठी पोंभुर्णा येथे धान व लाख विक्रीची व्यवस्था करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यानी सांगितले. शासन राज्यात पाच हजार विहिरी बांधण्याचा कार्यक्रम राबवित असून चंद्रपूर जिल्ह्यात आॅक्टोंबर महिन्यात ही योजना सुरु करण्यात येणार आहे. याचा लाभ पोंभुर्णा येथील अनेक शेतकऱ्यांना देण्यात येईल. कर्नाटक येथील अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने या विहिरी खोदण्यात येतील. टाटा ट्रस्टच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षण अहवालाचे टाटा ट्रस्टच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. दिघोरी-फुटाना रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे व वेळवा-चेकफुटाना रस्त्याची दुरुस्ती करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. पोंभुर्णा येथील बसस्थानक आधुनिक करण्यासाठी जागा शोधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम जलद गतीने करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. दुग्ध उत्पादन व कुक्कुटपालन हे रोजगार देणारे व्यवसाय असून पोंभुर्णा तालुक्यात दुग्ध व्यवसाय सुरु करण्यावर भर देण्यात येईल. नोव्हेंबरमध्ये कुक्कुटपालन प्रशिक्षण घेऊन महिलांना कुक्कुट शेड तयार करून देण्यात येईल, असे सांगितले. ईकोपार्कचे, शाळांना संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.