शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धान पऱ्ह्यांची रोवणी सुरू

By admin | Updated: August 5, 2014 23:44 IST

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार

सिंदेवाही : खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सिंदेवाही तालुक्यात धान पऱ्हे रोवणीला प्रारंभ झालेला आहे. यावर्षी खरीप हंगामाध्ये सिंदेवाही तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे, तर २२ हेक्टरवर आवत्याची पेरणी करण्यात आली आहे. आता धान पऱ्हे पेरणी योग्य झाले असून तालुक्यात आतापर्यंत २५ टक्के रोवणी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची विहीर व विद्युत पंप, बोरवेलची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केलेली आहे. जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहेत, ते शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तलाव व बोड्या भरण्यासाठी साधारणत: १ हजार २०० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी आतापर्यंत ५७५ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षी भात संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद पीकेव्ही गणेश, पीकेव्ही किसान या वाणाची, कृषी सेवा केंद्रातून जय श्रीराम, सुवासिक ५५५, हिरा, सायराम नर सर्व सामान्य शेतकरी एचएमटी, श्रीराम बलवान परभणी, सोनम, क्रांती, ओमशांती या वाणाची लागवड केली आहे. सध्या महिला मजुरांची रोवण्याची मजुरी ८० ते १०० रुपयांपर्यंत गेली आहे. तालुक्यात सिंचन प्रकल्प नाहीत. भविष्यात हुमन व गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गाशिवाय पर्याय नाही. (तालुका प्रतिनिधी)