शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान संशोधकाची आजाराशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:31 IST

ग्रामीण भागातील तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देशासकीय मदतीसाठी याचना : तीन वर्षांपासून अर्धांगवायूने ग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.१९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या शेतात धान पीक लावून त्यात तांदळाचे संशोधन केले. दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एचएमटीसारख्या वाणाची निर्मिती करणाऱ्या या कृषितज्ज्ञाचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. सरकार आणि समाजालाही आज या सच्चा संशोधकाची आठवण राहिलेली नाही.शरद पवारांपासून ते डॉ. अब्दुल कलामांपर्यंत अनेकांनी त्यांना सन्मानित केले आहे. परंतु मान-सन्मानांनी पोट भरत नाही, या वास्तवाचा अनुभव दादाजींचे कुटुंबीय घेत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेक लोक श्रीमंत झाले; पण दादाजींची परिस्थिती आहे तशीच आहे. एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे, असा त्यांचा परिवार आजही मोलमजुरी करूनच जगतो आहे. अंथरुणाला खिळलेल्या या संशोधकाची उपेक्षा कधी संपणार, हा खरा प्रश्न आहे.अवघ्या दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.त्यांच्या नावावर ९ धान वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते. सामान्यातून आलेल्या या धान संशोधकाला तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूने ग्रासले. तीन वर्षांपासून ते अंथरुणावर खिळले आहेत. आपले ज्ञान उदारपणे लोकांना वाटणाºया दादाजींना आयुष्याच्या उत्तरार्धात लहान-लहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडे केलेली मदतीची मागणी अद्याप दुर्लक्षित आहे. मात्र सोशल मीडियावर सुरु असलेले 'दादाजी खोब्रागडे मदत अभियान' शासन स्तरावर खळबळ उडवून गेले आहे.शोधलेले वाणएचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू, हे नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.बाबाला आजपर्यंत शंभराहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मात्र आता मदतीची गरज असताना शासनाकडून मदत मिळेणासी झाली आहे. शासन मदत करायला तयार नसेल तर मिळालेल्या पुरस्काराची होळी करेन.-मित्रदीप खोब्रागडे ,दादाजींचा मुलगा.