शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

चुकीच्या नियोजनामुळे धान पिकात पाणी

By admin | Updated: November 19, 2015 01:34 IST

शासनाच्या पाटबंधारे उपविभाग वरोरा शाखा चारगाव बुज अंतर्गत येत असलेल्या पारोधी चंदनखेडा क्षेत्रात धानाचे पीक कापणीवर आले आहे.

शेतकरी अडचणीत : चारगाव धरणाच्या कर्मचाऱ्याचा प्रतापचंदनखेडा : शासनाच्या पाटबंधारे उपविभाग वरोरा शाखा चारगाव बुज अंतर्गत येत असलेल्या पारोधी चंदनखेडा क्षेत्रात धानाचे पीक कापणीवर आले आहे. विभागाला वारंवार सूचना करुनही पाटबंधारे विभागाच्या कोंगरे या कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षीतपणामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने हे पाणी शेतात शिरले आहे. परिणामी अनेकांचे धानपीक पाण्याखाली आले आहे. चारगाव बुज धरणातून नहराद्वारा पारोधी चंदनखेडा टेलकडे शेतीसाठी पाणी पुरविले जाते. या भागात धान पीक घेतले जात असून सध्यास्थितीत धान कापणीवर आले आहे. कापणीच्या वेळेस दरवर्षी चुकीच्या नियोजनामुळे धानपीक पाण्याखाली येवून धानाची नासाडी होत आहे. यामुळे अनेक शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे. या प्रकाराबाबत पाटबंधारे विभागाच्या जबाबदारी सांभाळत असलेल्या कोंगरे यांना जाणीव करुन दिली असता, ९ नोव्हेंबरला पाणी बंद केले जाईल, असे उत्तर दिले. मात्र त्यानंतरही पाणी सुरू ठेवून १५ नोव्हेंबरला बंद होईल, असे उत्तर दिले. परंतु ही तारीख जाऊनही पाण्याचा अपव्यय सुरू आहे. कोंगरे यांचे एका ठराविक व्यक्तीशी लागेबांधे असल्याचे कोरडवाहू जमिनीवर धानपीक घेण्यासाठी त्यांना पाणी उपलब्ध करून देत असल्याचे समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी केली. सोबतच धानपिकात टाकलेली लाखोरी सुद्धा या पाण्यामुळे सडलेली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सद्यास्थितीत शेतात पाणीच पाणी आहे. त्यामुळे हे पीक कापणीवर येवूनही पाणी असल्याने कापणी करण्यास शेतकरी असमर्थ आहे. त्या स्थितीत कापणी केली तर धान हे पाण्याने ओेले होवून त्याचा परिणाम मालाच्या प्रतवारीवर दिसून येऊन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन पाणी बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)