शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरीचा ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: July 24, 2016 00:45 IST

पूर्व विदर्भातील पावसाळी पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ‘ओव्हरफ्लो’ अगदी टप्प्यात आहे.

पावसाळी पर्यटकांना खुणावतोयं !नागभीड : पूर्व विदर्भातील पावसाळी पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ‘ओव्हरफ्लो’ अगदी टप्प्यात आहे. गेल्या दोन वर्षाच्या ‘गॅप’ नंतर हा तलाव ओव्हरफ्लो होत असल्याने पावसाळी पर्यटकांच्या नजरा या ओव्हरफ्लोकडे खिळल्या आहेत.खरेतर या तलावाची निर्मिती इंग्रजांनी १९०५ मध्ये केली. तीन बाजुला नैसर्गिक टेकड्या असून एका बाजुला बांध घालून हा तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावाची निर्मिती करताना परिसरातील शेतीसाठी सिंचन हाच प्रमुख उद्देश इंग्रजांचा असावा. पण आता सिंचनासोबतच घोडाझरी पर्यटनासाठीच अधिक प्रसिध्द झाले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोडाझरीची प्रसिद्धी पूर्व विदर्भात झाली आहे. म्हणूनच नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन घोडाझरीला वर्षभर भेटी देत असतात. पण घोडाझरी पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरुन होणाऱ्या ओव्हर फ्लोचा आनंद घेण्याची जी मजा असते ती मजा काही औरच असते. २०१३ मध्ये असा ओव्हर फ्लो निघाला होता. त्यानंतर दोन वर्ष पुरेशा पावसाअभावी हा ओव्हर फ्लो निघालाच नाही. त्यामुळे पावसाळी पर्यटकांची घोर निराशा झाली.या दोन वर्षानंतर यावर्षी पडलेल्या पावसावरून त्याचा अंदाज आणि घोडाझरी तलावातील साठवणूक झालेल्या पाण्याची स्थिती लक्षात घेतली तर हा तलाव आता लवकरच ओव्हरफ्लो होईल, असे संकेत दिसतात. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार ओव्हरफ्लो होण्याला आता केवळ तीन फुट पाणी शिल्लक आहे. तालुक्यात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला तर हा तलाव ओव्हर फ्लो होऊ शकतो.केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नाही तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यातील पर्यटकांचेही या ओव्हरफ्लोकडे नजर खिळून आहे. सभोवती डोंगर त्या डोंंगरावरील हिरवीगर्द वनराई आणि मधोमध विशाल असे घोडाझरी जलाशय. हे मनोरम दृश्य नजरेत साठविण्यासाठी या कालावधीत रोज हजाराच्या संख्येतील पर्यटक या ठिकाणी येत असतात. याशिवाय या ओव्हर फ्लोमध्ये आंघोळीची मजासुद्धा वेगळीच असते. (तालुका प्रतिनिधी)