शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर मात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:11 IST

आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठस्तरीय सर्वच बाबी आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली़ नवीन आव्हाने उभी आहेत.

ठळक मुद्देबबन तायवाडे : सरदार पटेल महाविद्यालयात संशोधन पत्रिकेचे प्रकाशन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठस्तरीय सर्वच बाबी आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली़ नवीन आव्हाने उभी आहेत. यावर मात करण्यासाठी रचनात्मक व्हावे, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित संशोधन पत्रिका प्रकाशन व सत्कार समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश मामीडवार प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, उपप्राचार्यडॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन पत्रिकेचे समन्वयक डॉ. विजय वाढई, डॉ. कविता रायपूरकर आदी उपस्थित होते. विद्यापीठ प्राधिकरणावर कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही विचार मांडले़ सिनेट सदस्य मामीडवार, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. प्रमोद शंभरकर, संजय रामगीरवार, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. विजय वाढई, डॉ. एस. बी. किशोर, डॉ. सुनीता बन्सोड, यांच्यासह नेट परीक्षा उत्तीर्ण, प्रा. संदेश पाथडे, प्रा. आशिष शेंडे, सेट परीक्षा उत्तीर्ण प्रा. निशांत शास्त्रकार, प्रा. स्वप्नील भगत, प्रा. वेदांत अलमस्त, प्रा. सरोज यादव आणि प्रा. कविता रायपूरकर व प्रा. राहुल कांबळे यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.मामीडवार म्हणाले, शांताराम पोटदुखे यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी दिली़ माझ्यासारखे अनेक व्यक्ती या क्षेत्रात सक्रिय कार्य करीत आहेत़ त्यामुळे नव्या दमाने काम करण्याचा उत्साह वाढला़ यावेळी डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. प्रमोद शंभरकर यांचीही भाषणे झालीत. शांताराम पोटदुखे म्हणाले, चंद्रपुरात शिक्षणाचे दालन सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली़ त्यातून शिक्षणाचा विस्तार झाला़ ही परंपरा यापुढेही कायम राहणार आहे़ प्रास्ताविक प्राचार्य डॉ. इंगोले, संचालन डॉ. शरयू पोतनूरवार यांनी केले़ रक्षा धनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.