शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१०० एकरातील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: June 25, 2016 00:37 IST

अवैध जंगलतोड करुन शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ शेतकऱ्यांचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला.

तगडा पोलीस बंदोबस्त : वनविभाग, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिततळोधी (बा.) : अवैध जंगलतोड करुन शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ शेतकऱ्यांचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला. तब्बल १०० एकरात हे अतिक्रमण करण्यात आले होते. शुक्रवारी पोलिसांच्या तगडा बंदोबस्त संपूर्ण अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले.तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या राजोली (बोंड) या गावाजवळील कंपार्टमेन्ट ७२५ व १०५ या संरक्षित जंगलातील झाडे तोडून शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या अभिलाषा सोनटक्के यांनी या परिसरात होत असलेल्या अवैध जंगलतोड मोहिमेला आळा घालून अवैध अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील संरक्षित जंगलात ३१ शेतकऱ्यांनी जवळपास १०० एकरात हे अतिक्रमण केले होते. ही बाब सोनटक्के यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांकडे अतिक्रमण हटविण्यासाठी परवानगी मागितली. वरिष्ठानी परवानगी देताच त्यांनी महसूल विभाग, पोलीस विभाग याची मदत घेतली व सर्व ताफा शुक्रवारी सकाळीच बोंड येथे दाखल झाला. त्यानंतर ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, त्या ठिकाणी ताफा पोहोचला व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले.या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत गावकऱ्यांत तीव्र असंतोष दिसून आला. मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तासमोर अतिक्रमण हटविणे रोखण्यासाठी कोणीही समोर आला नाही. ही कारवाई सकाळपासून सुरू होऊन दिवसभर चालली. अतिक्रमण हटाव मोहिमेच्यावेळी उपविभागीय अधिकारी उमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, तहसीलदार समीर माने, नागभीडचे ठाणेदार बी.डी. मडावी व तळोधीचे ठाणेदार विवेक सोनवाने घटनास्थळी तळ ठोकून होते. (वार्ताहर)पेट्रोलिंग करीत असताना अतिक्रमण होत असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली. सर्व माहिती गोळा केली व वरिष्ठांची परवानगी घेवून अनाधिकृत असलेले अतिक्रमण हटविले. यात ३१ जणांवर वनविभागाच्या कायद्यान्वये अवैध वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - अभिलाषा सोनटक्के, वनपरिक्षेत्राधिकारी, तळोधी (बा.)अतिक्रमणधारकांतकारवाईची धास्तीजवळपास १०० एकरात हे अतिक्रमण होते. अनुचित घटना घडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथक, पोलीस पथक, वनविभागाच्या पथकाचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. या कारवाईने अवैध अतिक्रमणधारकांत चांगलीच धास्ती पसरली आहे.