शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांची थकबाकी ६१ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:59 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात कृषी पंपधारकांकडील असलेल्या वीजबिल थकबाकीचा आकडा ६१ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर परिमंडळ : थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडीत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात कृषी पंपधारकांकडील असलेल्या वीजबिल थकबाकीचा आकडा ६१ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे. थकबाकीदार कृषी पंपधारकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम वीज कंपनीकडून हाती घेण्यात आली असून चालू एक वर्षाच्या बिलाची थकबाकी न भरल्यास कृषी पंधारकाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.महावितरणद्वारे चंद्रपूर परिमंडळात अनेक ग्राहकोपयोगी योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून थकबाकीदारांना दिलासा मिळत आहे. मात्र अशा योजनानंतरही अनेक ग्राहक थकीत बिलाचा भरणा करण्यास दिरंगाई करीत आहेत. एकीकडे महावितरणकडून अनेक कामे सुरू असताना कृषी पंपधारकांकडून वीज बिलाची वसुली मात्र अत्यल्प आहे. याचा फटका बसून महावितरणला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने पाऊल उचलत चालू एक वर्षाचे देयक व थकबाकीची रक्कम कृषी पंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.चालू वर्षाच्या देयकाव्यतिरिक्त उर्वरीत थकबाकीही टप्प्याटप्प्याने कृषी पंधारकांनी भरण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. तसेच कृषी पंपधारक वीज ग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरूस्त करण्यापूर्वी कृषी पंपधारकांनी कृषी पंपावर योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविणे अत्यावश्यक आहे. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविला असल्याची खातरजमा केल्यावरच नवीन रोहित्र देण्याचे निर्देश आहेत. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविला असल्यास महावितरणच्या वीजवहन यंत्रणेवर ताण येत नसतो तसेच कृषी पंपधारकांच्या पंपास योग्य वीजपुरवठा मिळूण ते जळण्याची शक्यता नसते, असे त्यांनी म्हटले आहे.विभागनिहाय थकबाकीचंद्रपूर परिमंडळांतर्गत असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली मंडळातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपूरी अशा सहाही विभागातील कृषी पंपधारकांकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे. यात चंद्रपूर विभागातील कृषी पंपधारकांकडे २ कोटी १३ लाख २१ हजार, वरोरा विभागात १६ कोटी ८० लाख ७१ हजार, बल्लारपूर विभागात १७ कोटी ७८ लाख ४ हजार, गडचिरोली विभागात ७ कोटी ४२ लाख ८३ हजार, आलापल्ली विभागात ६ कोटी ६८ लाख ५७ हजार व ब्रम्हपूरी विभागात ११ कोटी १४ लाख १३ हजार रूपये थकबाकी आहे.