शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या कार्यालयावर कामगारांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने  यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असता. कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात मागील अनेक वर्षांपासून पट्टेदार वाघ, बिबटे तसेच इतर हिंसक जंगली प्राण्यांचा वावर आहे. दरम्यान, दोन दिवसात दोघांचा बळी घेतला आहे. या प्राण्यामुळे कामगार तसेच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघ तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी मनसेचे नगरसेवक तथा मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होेते.वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने  यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असता. कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, वनविभागाच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ सर्व कामगार संघटनांनी व कामगारांनी एकत्रितरीत्या वनविभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले  होते. वनविभाग व सीएसटीपीएस प्रशासनाविरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.  चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक आर. प्रवीण यांनी मोर्चाला मोर्चातील शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  यावेळी मनसेचे नगरसेवक तथा मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर, नगरसेवक तथा कंत्राटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष  बंडू हजारे, युवासेना कैलास तेलतुंबडे, अमोल मेश्राम, प्रफुल्ल संगोरे, प्रमोद कोल्हारकर, इंटकचे नीताई घोष, शिटू वामन बुटले, मनसेचे नितीन भोयर, गजानन जवादे, शंकर बागेसर, मंगेश चौधरी, कामगार क्रांती संघटनेचे रवींद्र चांदेकर, विजय केळझकर आदी उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्तवनविभागाच्या कार्यालयावर कामगारांनी मोर्चा काढला. कामगार तसेच नेत्यांचा आक्रोश लक्षात घेता काही अनूचित घटना होऊ नये. यासाठी पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

टॅग्स :agitationआंदोलनforest departmentवनविभाग