शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान थकल्याने लाभार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST

चंद्रपूर : येथील महापालिका तसेच शासकीय वैद्यकीय काॅलेजमध्ये विविध पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ...

चंद्रपूर : येथील महापालिका तसेच शासकीय वैद्यकीय काॅलेजमध्ये विविध पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त पदे भरून दिवासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बांधकाम साहित्य हटवावे

चंद्रपूर : शहरातील सिस्टर काॅलनी, तुळशीनगर परिसरामध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे शहरात बेरोजगारीत वाढ झाली आहे.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणा

चंद्रपूर : येथील लालपेठ, पडोली, बंगाली कॅम्प परिसरातून बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र धोकादायक व वर्दळीच्या वळणांवरही चालक वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बंद पथदिव्यांमुळे नागरिकांना त्रास

चंद्रपूर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. मात्र, विभागाकडे निधी नसल्याने आजपर्यंत अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत, लाभार्थी अनुदानासाठी चकरा मारत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

वाहकांकडे चिल्लरचा तुटवडा

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून बसच्या वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसमधून प्रवास करताना टप्प्याप्रमाणे प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेतल्या जाते. एखाद्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान तीन टप्पे पडत असतील तर त्या प्रवाशाला तिकीट लागते. प्रवाशाकडे चिल्लर पैसे असल्यास देतो. मात्र अनेक वेळा सुटे पैसे राहत नसल्याने वाहक त्या तिकिटामागे शिल्लक रक्कम लिहून देतो.

पथदिवे बंद असल्याने त्रास

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही वाॅर्डातील पथदिवेही बंद आहे.

रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या दोन वाहानांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत दंड वसूल केला. ही कारवाई गुरुवारी पोलिसांनी केली.

जागेचे पट्टे देण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील बहुतांश भाग हा नझूलच्या जागेवर वसला आहे. घर असूनही पट्टे नसल्यामुळे येथील नागरिकांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. घरकुल योजनेंतर्गत अनेकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्याने घराचे स्वप्न लांबले आहे.

सिटी बस सुरू करावी

चंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने सिटी बस सुरू करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, दाताळा, पडोली, ऊर्जानगर, बंगाली कॅम्प आदी परिसरातून गांधी चौकामध्ये येणे आर्थिकदृष्ट्या सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यातच ऑटोचालकांनीही दर वाढविल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सिटी बस सुरू करण्याची मागणी केली जात आहे.