शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक १७६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोरोना गेल्याच्या भ्रमात ...

चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोरोना गेल्याच्या भ्रमात राहून बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांना शुक्रवारी जोरदार धक्का बसला. एकाच दिवशी तब्बल १७६ जणांना कोरोनाची बाधा झाली तर एका महिलेचा मृत्यू झाला.

त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅन्टिजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्याच्या मूलभूत सुविधा निर्माण केल्या. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हेल्थ सेंटर व प्रत्येक तालुक्यात अ‍ॅन्टिजेन तसेच आरटीपीआर चाचण्यांसाठी केंद्र तयार केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सातत्याने जागृती केली जात आहे. पण, कोरोना आटोक्यात आला नाही.

त्रिसूत्रीचा विसर महागात पडणार

नियमित मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे ही साधी त्रिसूत्री पाळण्याचे भान नागरिकांना राहिले नाही. त्यामुळे शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १७६ जणांना बाधा झाली. जिल्ह्यात २४ तासात ५४ जणांनी कोरोनावर मात केली तर बल्लारपूर येथील ६८ वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर हॉट स्पॉट होण्याची भीती

जिल्ह्यात बाधितांची संख्या २४ हजार ४९ वर पोहोचली. सध्या ५५५ बाधित उपचार घेत आहेत. दोन लाख १९ हजार ७७७ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ९३ हजार ५१८ नमुने निगेटिव्ह आले. मात्र, चंद्रपूर शहरातच रुग्णसंख्या वाढत असल्याने हॉट स्पॉट होण्याची भीती आहे.

तालुकानिहाय रुग्ण

आज बाधित आढळलेल्या १७६ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ३३, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, नागभीड तीन, सावली १९, राजुरा आठ, चिमूर सहा, वरोरा ५९, कोरपना १४, जिवती २० व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

कोट

कोरोना संपला, या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे. मात्र, नागरिक म्हणून प्रत्येकाने कर्तव्य पाळावे.

मास्कशिवाय घराबाहेर निघू नये. अनावश्यक कामे टाळावे.

-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर