शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

मूल नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

By admin | Updated: January 1, 2017 01:13 IST

नगर परिषद मूलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राचार्या रत्नमाला भोयर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार मावळत्या नगराध्यक्षा

उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे : स्वीकृत सदस्यपदी अजय गोगुलवार मूल : नगर परिषद मूलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राचार्या रत्नमाला भोयर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार मावळत्या नगराध्यक्षा रिना थेरकर यांच्याकडून स्वीकारला. नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यपदाचीही निवड झाली. उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे तर स्विकृत सदस्यपदी अजय गोगुलवार व चंद्रकांत आष्टनकर हे दोन्ही भाजपाचे अविरोध निवडून आले आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्षासह १७ पैकी १६ सदस्य निवडून आल्याने स्पष्ट बहुमत भाजपाला मिळाले होते हे विशेष! नगराध्यक्षपदाची सुत्रे नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या उपस्थित स्वीकारली. मूल नगराचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध असून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मूल शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे, असे मत ‘लोकमत’शी बोलताना भोयर यांनी व्यक्त केले. निवडणुकीदरम्यान भाजपाने दिलेल्या वचननाम्याची टप्प्या-टप्प्याने पुर्तता करण्याचा आपला प्रयत्न राहणार असून मूल शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आखणी केली जाणार आहे. मूल शहर हागणदारीमुक्त करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याची सुविधा, विजेची सुविधा, नालीची नियमित सफाई, ओपन स्पेस जागेत बगीचा व सौंदर्यीकरणावर भर, महिलांना व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे, तसेच जे वचननाम्यात देण्यात आले आहे, त्याची पूर्तता करण्यास कटीबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. नगर परिषद मूलच्या उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे व स्विकृत सदस्यपदी अजय गोगुलवार व चंद्रकांत आष्टनकर यांची निवड झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यात उत्साह संचारला. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने झालेल्या या निवडणुकीमुळे व भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व शांततेत पार पडले. यावेळी भाजपाचे राम लखिया, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, चंदू मारगोनवार, नगरसेवक विनोद सिडाम, प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, प्रशांत लाडवे, करकाडे, मिलिंद खोब्रागडे, रेखा येरणे, शांताबाई मांदाडे, वनमाला कोडापे, विद्या बोबाटे, आशा गुप्ता आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी;