शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची तजवीज करताना अंगाची लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:22 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचना प्रश्न उभा ठाकला होता. त्यानंतर रबीमध्ये पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती.

ठळक मुद्देउन्हाची तीव्रता वाढतेयं : अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचना प्रश्न उभा ठाकला होता. त्यानंतर रबीमध्ये पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती. आता तर पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. दुसरीकडे सूर्याचेही आग ओकणे सुरू आहे. अशा तप्त उन्हात पाण्याची तजवीज करताना ग्रामीणांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.यावर्षी पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकऱ्यांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली. शेतकºयांना खरिपात मोठा फटका सहन करावा लागला.यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. नलेश्वर, चंदई, लभानसराड या प्रकल्पात जानेवारी महिन्यात पाहिजे तसा जलसाठा नव्हता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले. इरई धरणासह संपूर्ण सिंचन प्रकल्प आता एप्रिल महिन्यात ड्राय होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिना संपायला आला आहे. उन्हाची तिव्रताही वाढत आहे. पारा ४५ अंशापार गेला आहे. ग्रामीण भागातील जलस्रोट आटले आहे. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावातील नागरिक आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करीत आहे. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. विशेष म्हणजे, या गुड्यातील नागरिकांना चक्क डबक्यातील पाणी पिऊन आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागत आहे. दरवर्षी हे विदारक चित्र समोर येते. मात्र संबंधित विभागाकडून यावर आजपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे आता येथील नागरिकही आहे त्या परिस्थितीतच वेळ निभावून नेत आहेत.नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यातीलही अनेक गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करते. उपाययोजनाही कागदावर असतात. मात्र प्रत्यक्षात पाणी टंचाईची झळ सहन करणारी गावे त्यांच्या यादीतच नसतात. कागदावरील उपाययोजनाही बहुतांश प्रत्यक्षात अमलात येत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड उन्हाळाभर सुरू राहते, असा आजवरचा अनुभव आहे. यावर्षीही जिल्हा परिषद तोच कित्ता गिरवत आहे.हजारो हातपंप बंदजिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईचा आराखडा तयार करून उपाययोजनेसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जातो. त्याला मंजुरीही मिळते. मात्र परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. उन्हाळाभर नागरिकांची भटकंती थांबत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा आधार असलेले हातपंप अखेरची घटका मोजत आहेत. जिल्ह्यातील असे हजारो हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहेत. आराखड्याची अंमलबजावणी तर सोडा, साधे बंद असलेले हे हातपंप दुरुस्तीचे सौजन्य आजवर जिल्हा परिषदेने दाखविले नाही.