शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

वन्यजीव सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

By admin | Updated: September 27, 2016 00:52 IST

चिमूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शेडेगाव राऊंड व वनव्यवस्थापन समिती शेडेगाव यांच्या वतीने वन्यजिव सप्ताह ...

१ ते ७ आॅक्टोबर : चिमूर वन विभाग व वनव्यवस्थापन समिती शेडेगावचा उपक्रमचिमूर : चिमूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शेडेगाव राऊंड व वनव्यवस्थापन समिती शेडेगाव यांच्या वतीने वन्यजिव सप्ताह निमित्त १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमासह शालेय विद्यार्थ्यांसाठी व शालेय बाह्य विद्यार्थ्यांसाठी व गावातील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाद्वारे व वनविभागाद्वारे राज्यात वन्यजिव सप्ताहचे आयोजन करण्यात येते. या वन्यजीव सप्ताह निमित्त मानवाला वन्यजीवाबाबत प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी व पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना कळावे, या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात.चिमूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी बी.पी. चिवंडे व शेडेगाव राऊंडचे सहा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.सी. धुर्वे यांच्या संकल्पनेतून या सप्ताहामध्ये शेडेगाव येथे गावकऱ्यांसाठी व जिल्हा परिषद तथा आठवले समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जंगल, वन्यप्राणी आणि पर्यावरणावर आधारित विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.वन्यजीव सप्ताहादरम्यान, वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, पर्यावरणातील योगदान लक्षात घेता वनाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या दृष्टीने नागरिकात जाणीवजागृती करण्यासाठी वन विभाग, शेडेगाव व व्यवस्थापन समितीच्या वतीने १ आॅक्टोबरला निबंध स्पर्धा यामध्ये जल व मृदसंधारण आणि जलशिवार, मानवी जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व, वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता, संयुक्त वनव्यवस्थापन समिती आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच ३ आॅक्टोबरला चित्रकला स्पर्धा, ४ तारखेला सामान्य ज्ञान स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)विजेत्यांचा होणार गौरवविजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसासह प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तर ५ आॅक्टोबरला वनावर आधारित प्रबोधनात्मक कलापथकाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ आॅक्टोबरला परिसरातील व सहभागी विद्यार्थी, नागरिकांना एक दिवसाची जंगल भ्रमंती व जनजागृती शिबिराचे आयोजन शेडेगाव कॅम्प जवळील कक्ष क्रमांक ३७१ मध्ये करण्यात आले आहे. तेव्हा वन्यजीव सप्ताहादरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्षेत्र सहायक व्ही. सी. धुर्वे व वन व्यवस्थापन समितीने केले आहे.