चंद्रपूर : लोकशाहीमध्ये प्रत्येकाला माहितीची पारदर्शकता निर्माण व्हावी, भष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्याबाबत नागरिकांना माहिताी असावी. तसेच माहिती अधिकार व कार्ये याबाबत शुक्रवारला स्थानिक जनता महाविद्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या वतिने माहिती अधिकार अधिनियम २००५ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस उपअधिक्षक घुगे, पोलीस निरिक्षक विठ्ठल आचेवार, प्राचार्य एम. सुभाष आदी उपस्थित होते. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधीक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याचे दृष्ट्रीने, सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहार्थ शासन पद्धत आखून देण्याकरिता महितीचा अधिकार अधिनियम २००५ रोजी घटनात्मक अमंलबजावणी करण्यात आली. त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाचखोर अधिकारी लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. (नगर प्रतिनिधी)
माहिती अधिकार अधिनियम २००५ चे आयोजन
By admin | Updated: January 2, 2017 01:09 IST